एक्स्प्लोर

Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'

Ashok Kharat Crime news: पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत आहे, तसतशी अशोक खरातच्या पायाखालची जमीन सरकली असून, कधीकाळी पोलिसांनाच धमकावणारा हा भोंदू आता कोठडीत पुरता हबकला असल्याची माहिती समोर येत आहे.

Ashok Kharat Crime news: स्वतःला 'दैवी अवतार' भासवून शेकडो भाविकांना गंडा घालणारा भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) आता पूर्णपणे जमिनीवर आला आहे. पोलीस कोठडीचा फास जसजसा घट्ट होत आहे, तसतशी खरातच्या पायाखालची जमीन सरकली असून, कधीकाळी पोलिसांनाच (Police) धमकावणारा हा भोंदू आता कोठडीत पुरता हबकला असल्याची माहिती समोर येत आहे.

तपास पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कोठडीच्या पहिल्या दोन-तीन दिवसांत अशोक खरातचा तोरा काही वेगळाच होता. " तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल," असे म्हणत तो चक्क तपास करणाऱ्या पोलिसांचेच भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, एसआयटी (SIT) आणि ईडीच्या (ED) वाढत्या चौकशीमुळे आता त्याची बोलती बंद झाली आहे. आपण आता सहज तुरुंगातून बाहेर पडणार नाही, याची खात्री त्याला पटली असून तो स्वतःच्या भविष्याबद्दल कमालीचा चिंतेत आहे.

Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं

कोठडीत खरात आता जास्त कोणाशी बोलत नाही. तपासादरम्यान विचारलेल्या प्रश्नांनाही तो त्रोटक उत्तरे देत आहे. चिंतेमुळे त्याचे जेवणही कमी झाले असून तो तासनतास शांत बसून असतो, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, बाहेर पडल्यानंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने, न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारेच व्हावी, अशी विनंती तो अधिकाऱ्यांकडे वारंवार करत आहे.

Ashok Kharat Crime news: बायकोचा पत्ता विचारताच अशोक खरात म्हणाला...

अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार आहे. ती कुठे आहे? असा प्रश्न जेव्हा तपास अधिकाऱ्यांनी विचारला, तेव्हा खरातने "ते देवालाच माहीत" असे म्हणत हात झटकले. मात्र, दुसरीकडे आपला लाडका मुलगा हर्षवर्धन याच्यासाठी तो व्याकुळ झाला आहे. "माझ्या मुलाची मला काळजी वाटते, मला त्याच्याशी एकदा फोनवर बोलू द्या," अशी विनंती तो पोलिसांकडे करत आहे. 

Ashok Kharat Crime news: अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार

दरम्यान, भोंदू अशोक खरातला आज (दि. 13) पुन्हा नाशिक कोर्टात हजर केले जाणार आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असल्याने त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर चौथ्या गुन्ह्यात पुन्हा आज अशोक खरातला पोलीस कोठडीत मिळण्यासाठी एसआयटी प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसापासून एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंत काय तपास झाला? याचा तपशील तपास यंत्रणा कोर्टात सादर करणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अशोक खरातला कोर्टात हजर केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Case Nashik Crime News: ईशानेश्वर मंदिर, कार्यालय ते फार्महाऊस... अशोक खरातच्या मालमत्तांची ED कडून झाडाझडती, आज पुन्हा कोर्टात हजर करणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Pune Accident: पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
Ashok Kharat Crime News: चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
Gadchiroli Naxal: गडचिरोली झाला ‘नक्षलमुक्त’! पोलिसांच्या ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद; मोठा शस्त्रसाठ्यासह तब्बल 65 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त
गडचिरोली झाला ‘नक्षलमुक्त’! पोलिसांच्या ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद; मोठा शस्त्रसाठ्यासह तब्बल 65 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
श्रेयस अय्यर मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचणार, धोनी आणि कोहलीनंतर असा करणारा पाचवाच कॅप्टन होणार
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
'मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत न्यायमूर्तींची गरज नाही' केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
तिरुवनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन बोगीमध्ये भीषण अग्नितांडव; अवघ्या 15 मिनिटात 68 प्रवाशांना बाहेर काढल्याने जिवितहानी टळली
NEET Exam Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात 'टेलिग्राम'चा सर्वाधिक वापर, शुभम खैरनारनंतर आता नाशिकमधील बडे क्लासचालक अडकणार CBI चौकशीच्या फेऱ्यात
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
Embed widget