Ashok Kharat Case : राज्यासह देशात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाचाअद्यापतपाससुरुअसूनखरातची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (ED) रोज चौकशी सुरु आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्याअसतानाच अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठ घबाड सापडल्याचीमाहितीआहे. ईडीच्या छापेमारीत अशोकखरातकडेअसलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे मिळाले आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

Nashik Crime News : 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली

मिळालेल्यामाहितीनुसार, ज्यामध्ये पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यातआल्याचीमाहितीआहे. ईडीने अशोक खरातची 2 कोटी 50 लाखांची बँकेतील रक्कम गोठवली आहे. तर ईडीकडून अशोक खरातची एक मर्सिडीज बेंझ गाडीही जप्त करण्यात आलीय. अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली असल्याचीमाहितीआहे. ईडीने सोमवारीनाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यात मिळून एकूण 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलेहोते.

Ashok Kharat Case : तब्बल तेरा तासाहून अधिक वेळ चौकशी, महत्त्वाचे कागदपत्र जप्त

अशातच, भोंदू बाबा अशोक खरातच्या शिवनिका संस्था येथे कार्यालयातून ईडी पथकाने महत्त्वाचे कागदपत्र जप्त केल्याची माहिती आहे. तब्बल तेरा तासाहून अधिक वेळ हि चौकशी सुरू होती. ज्यामध्ये मिरगाव येथील शिवनीका संस्थान कार्यालय, जगदंबा पतसंस्थेतही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यातआली. तर काही बँक स्टेटमेंटसह कागदपत्रांची माहितीही ED ने घेतली. मंदिरातील पुजारी व कर्मचारी यांचे देखील इडी कडून चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेअशोकखरातचेपायआणखीनखोलातअसूनत्याचाअडचणीतआणखीवाढझालीआहे.

माझं मरण इथेच- अशोक खरात (Ashok Kharat Case)

अशोक खरात आता मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागला आहे. मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशीदरम्यान खरात म्हणाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच अशोक खरात याने आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. आतापर्यंत खरातवर 15 गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरु आहे. चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती मिळत आहे. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातमी: