Ashok Kharat and Anjali Damania: अशोक खरातला रुपाली चाकणकरांपेक्षाही जास्त फोनकॉल करणारा 'तो' सरकारी अधिकारी कोण; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Ashok Kharat and Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले. रुपाली चाकणकर , जयंत पाटील यांनी अशोक खरातला फोन केल्याचा दावा

Ashok Kharat and Anjali Damania: अशोक खरात याला वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त सक्रिय आणि पुढाकार घेणाऱ्यांमध्ये सरकारी अधिकारी अभिजीत भांडे-पाटील (Abhijit Bhande Patil) यांचा समावेश असल्याचा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला. अनेक राजकारणी, पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकारी अशोक खरात (Ashok Kharat) याला उठताबसता फोन करायचे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणतात की, माझा या प्रकरणात काहीही हात नाही. मात्र, त्यांनी अशोक खरात याला तब्बल 177 फोन कॉल केले होते. एका फोन कॉलवर तर त्या अशोक खरात याच्यासोबत 22 मिनिटं गप्पा मारत होत्या. मात्र, रुपाली चाकणकर यांच्यापेक्षाही अभिजीत भांडे-पाटील यांनी खरातला जास्तवेळा फोन केला होता, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. त्या बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Nashik Crime news)
अशोक खरात याला या प्रकरणातून सोडवण्यासाठी प्रचंड मदत करणाऱ्यांमध्ये अभिजीत भांडे पाटील यांचा समावेश आहे. अभिजीत भांडे-पाटील हे मुंबईत डेप्युटी कलेक्टर होते. ते झोपडपट्टी पुनर्वसन विभागात (एसआरए) कार्यरत होते. मात्र, नंतर त्यांची मूळ ठिकाणी बदली झाली. अभिजीत भांडे पाटील यांच्याकडे दोन मोबाईल फोन होते. त्यापैकी एका फोनवरुन त्यांनी खरात याला 143 वेळा तर दुसऱ्या फोनवरुन 53 वेळा कॉल केले होते. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात, मुलगी तृप्ती खरात, हर्षवर्धन खरात आणि सृष्टी खरात हे फरार आहेत. त्यांना कोणीतरी संरक्षण देत आहे. त्यामुळे एसआयटीने चौकशीसाठी या सगळ्यांना ताब्यात घ्यावे. अभिजीत भांडे पाटील हे खरातला मदत करण्यात सगळ्यात पुढे आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
रुपाली चाकणकर म्हणतात की, या प्रकरणात माझा काहीही हात नाही. मी काहीही चूक केलेले नाही. मग रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाकडून 5 तारखेला नोटीस पाठवली. 9 तारखेला चाकणकरांनी लगेच त्या प्रकरणाची सुनावणी घेतली. खरातची प्रकरणं संपवण्याची इतकी घाई तुम्हाला का झाली होती? रुपाली चाकणकर यांना एसआयटीने तातडीने चौकशीसाठी बोलवले पाहिजे. खरातशी संबंधित सर्व राजकारण्यांना कारमे दाखवा नोटीस पाठवा. प्रतिभा चाकणकर एसआयटीच्या चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, प्रतिभा चाकणकर म्हणाल्या समता पतसंस्थेतील माझ्या नावाची खाती खोटी आहेत, माझ्या सह्या खोट्या आहेत. मला कोणीही चौकशीला बोलावले नव्हते. आम्हीच आलो. पण त्यांना पाठवण्यात आलेली नोटीस माझ्याकडे आहे. अशोक खरात प्रकरणात नाशिक सीपी, एसआयटी, अहमदनगर सीपी या तीन ठिकाणी तपास सुरु असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.
आणखी वाचा






















