Ashok Kharat Case: अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणी एका IAS अधिकाऱ्यापाठोपाठ दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दोन महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या, अशी सूत्रांची माहिती आहे. 

अशोक खरातच्या संपर्कात एक डिसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाच्या अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. आवडती पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी अशोक खरात यांच्याकडे धाव घेतली होती का?, असा सवाल उपस्थित होत आहे. अशोक खरातसोबत काही आर्थिक व्यवहारही झाले का? याबाबत तपास होण्याची शक्यता आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

महिलांचं लैंगिक शोषण केल्याची अशोक खरातची कबूली- (Ashok Kharat ED Inquiry)

महिलांचं लैंगिक शोषण केल्याची कबुली अशोक खरातने केली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचं समोर आलं आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसंच शोषण केल्याची अशोक खरातने कबुल केल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची चौकशी होणार- (Ashok Kharat Son And Daughter)

अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात आला आहे. अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरातच्या पोलीस कोठडीचा आजचा शेवटचा दिवस उद्या अशोक खरातला न्यायालयात केले जाणार आहे. अशोक खरातच्या मुलाची आणि मुलीची चौकशी होणार मात्र पत्नी कल्पना अद्याप फरार आहे. अशोक खरातची महिलाचे लैंगिक शोषण आणि आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी एसआयटीकडून चौकशीसह जाब जबाब नोंदवण्यात काम सुरू आहे. 

तेजस्वी सातपुते आज पत्रकार परिषद घेणार- (Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून खरातने महिलांचे लैंगिक शोषण,आर्थिक गैर व्यवहार तसेच इतर काळे कारणामे  केल्याप्रकरणी एसआयटीकडून  तपास सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरात विरोधात दाखल गुन्हासंदर्भात सुरू असलेल्या तपासाची एसआयटीकडून महत्वाची माहिती देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासानंतर स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते पहिल्यांदाच प्रत्यक्ष साधणार माध्यमांशी संवाद आहेत. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचं लैंगिक शोषण कसं केलं?, अशोक खरातने सगळं सांगितलं, SIT च्या चौकशीतून हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News मोठी बातमी: होय, महिलांचं लैंगिक शोषण केलं, अशोक खरातची अखेर कबुली; म्हणाला, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!