Ashok Kharat Case Nashik Crime News:नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या एसआयटी चौकशीचा आज 12 वा दिवस आहे. कालही अशोक खरातची एसआयटीकडून 5 तास चौकशी करण्यात आली. अशोक खरातने मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान काल खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवून मिळाली. अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला होता. त्यामुळे आज पुन्हा अशोक खरातची चौकशी केली जाणार आहे.

Continues below advertisement

अशोक खरात प्रकरणी तपासात विविध माहिती समोर येत आहे. अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीत आणखी एक धक्कादायक पोलिसांच्या हाती लागली आहे. अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाइलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अशोक खरातच्या या मोबाइलमधून अनेक धागेदोरे समोर येत आहेत. अशोक खरातच्या मोबाइलमध्ये अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह असल्याने या प्रकरणाचा तपास अधिक गूढ बनला आहे.(Ashok Kharat Case Nashik Crime News)

प्रकरणाला आणखी गंभीर वळण- (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातचे दोन मोबाइल जप्त करण्यात आले असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. मोबाइलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचा संशय आहे. तर अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

Continues below advertisement

अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ- (Ashok Kharat Case)

न्यायालयाने अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या या गंभीर प्रकरणात पोलीस तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. तपासाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला समोर येत असल्याने, या वाढीव कोठडीत अशोक खरातच्या गुन्हेगारी साम्राज्याचे आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अशोक खरातची पोलीस कोठडी का वाढवली? (Ashok Kharat Case Nashik Crime News)

  1. भोंदू अशोक खरात हा तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही. म्हणून लागणारा अधिकचा वेळ.
  2. अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे. त्याची समक्ष चौकशी करायची आहे.
  3. महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. ते खाल्ल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत त्यांचे डोके जड व्हायचे. यानंतर अशोक खरात सांगायचा तसे या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे? याचा तपास करायचा आहे. आरोपी अशोक खरात याबद्दल कोणतीही माहिती देत नाही, त्याचा तपास करायचा आहे.
  4. अशोक खरातने भोंदूगिरी करत किती आणि कोणाच्या नावावर मालमत्ता जमा केली? याचा तपास करायचा आहे.
  5. अशोक खरात याने जे कृत्य केले त्यात त्याला कोणी मदत केली आहे का? याचा तपास करायचा असल्याने वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
  6. महत्त्वाचे म्हणजे हे प्रकरण मोठे आहे. तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. आरोपीकडून गुन्ह्याची माहिती घेऊन डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, आणि इतर पीडित महिलांची माहिती येणे बाकी आहे. या कारणास्तव आरोपी अशोक खरातला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता- (Rupali Chakankar Inquiry On Ashok kharat Case)

भोंदूबाबा अशोक खरातसोबतची ओळख रूपाली चाकणकरांना चांगलीच भोवली आहे. सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला. पण हे प्रकरण इतक्यावर संपलं नसून रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. खरातच्या अघोरी कृत्यांचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आता त्यांचा मोर्चा खरातशी संबंधित संस्थांकडे वळवला आहे. खरातच्या 'शिवनिका' संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहे. त्याच्या चौकशीसाठी रुपाली चाकणकर यांनाही समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. त्यामुळे रुपाली चाकणकारांच्या पाठीमागे आता चौकशीचाही सासेमिरा लागण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थानच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलं असून आज चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. 

संबंधित बातमी:

Ashok Kharat Nashik Crime News: कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला...