Ashok Kharat Nashik Crime news: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी अशोक खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. मात्र, अशोक खरात (Ashok Kharat) हा तपासात सहकार्य करत नसल्याने चौकशीसाठी वेळ लागत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एसआयटीकडून (SIT) अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण (Sexual Assault) करण्यासाठी पेढे आणि खारट चवीचे पाणी वापरत असल्याचा उल्लेख करण्यात आला. (Nashik Latest news)

Continues below advertisement

अशोक खरात याने दिलेला द्रव पदार्थ प्यायल्यावर आणि पेढा खाल्ल्यावर पिडीत महिला प्रभावित व्हायच्या आणि भोंदूबाबा जे बोलेल त्याच्या इशाऱ्यावर चालत होत्या. हे पाणी प्यायल्यानंतर महिलांना मळमळ व्हायची, डोके गरगरायचे किंवा जड व्हायचे. यानंतर अशोक खरात केबिनमधील लाईट बंद करुन त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरात त्यासाठी जे गुंगी आणणारे खारट किंवा कडवट चवीचे औषध वापरत होता किंवा कोणता पेढा महिलांना खायला द्यायचा, याचा तपास बाकी आहे. अशोक खरात याने याबाबत अद्याप कोणतीही उपयुक्त माहिती दिलेली नाही. त्यासाठी वेळ वाढवून द्यावा, अशी विनंती सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयाला केली होती. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत एसआयटी या गूढ द्रव पदार्थाबाबत आणि पेढ्यातील गुंगी आणणाऱ्या घटकाबाबतची माहिती मिळवण्यात यशस्वी होणार का, हे बघावे लागेल.

Nashik News: अशोक खरातच्या ईशान्येश्वर देवस्थानासाठी निधी कोणी मंजूर केला?

Continues below advertisement

भोंदूबाबा अशोक खरात  याचे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर देवस्थान पुन्हा चर्चेत आले आहे. पर्यटनस्थळांच्या यादीत समावेश नसतानाही या मंदिरासाठी निधी मंजूर झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 2018 मध्ये 1 कोटी 5 लाख निधी वितरित करण्यात आला. निधीसाठी कोणाचा प्रस्ताव? कोणाची शिफारस? याची माहितीच शासन दरबारी उपलब्ध नाही. प्रशासनाकडे संबंधित कागदपत्रांची स्पष्ट माहिती नसल्याचे समोर आले आहे. देवस्थान निधीचा प्रस्ताव अचानक गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशोक खरातच्या या मंदिराला राजकीय हस्तक्षेपातून निधी मिळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच निधी मंजुरी प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आणखी वाचा

अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

कोर्टात आणताच न्यायमूर्तींनी विचारलं, काही तक्रार आहे का? भोंदूबाबा अशोक खरातचं एका शब्दात उत्तर; म्हणाला...