एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: भक्तांना मरणाची भीती दाखवून आलिशान गाड्या अन् कोट्यवधी रुपये उकळले; आता ईडीकडून खरातचा ताबा घेण्याच्या हालचाली, भोंदूचा पाय आणखी खोलात

Ashok Kharat Case: अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी ED कडून न्यायालयात अर्ज करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ashok Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात 'ईडी' (ED) आता अशोक खरातचा ताबा घेण्याच्या तयारीत आहे. खरातने उभे केलेले आर्थिक साम्राज्य आणि त्यामागील मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) तपास करण्यासाठी ईडीने न्यायालयात अर्ज सादर केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Ashok Kharat Case: अध्यात्म आणि भीतीचा 'बनाव'

अशोक खरातने स्वतःला अध्यात्मिक गुरू भासवून हजारो भक्तांना जाळ्यात ओढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात भक्तांना 'मरणाची भीती' दाखवून त्यांना विविध पूजा करण्यास भाग पाडत असे. परदेशात 'परीस पूजा' आणि 'अवतार पूजा' करण्याच्या नावाखाली त्याने भक्तांकडून कोट्यवधी रुपये, महागड्या आलिशान गाड्या आणि मोक्याचे प्लॉट आपल्या नावावर करून घेतले. आशीर्वादाच्या नावाखाली चाललेला हा लुटीचा गोरखधंदा आता ईडीच्या रडारवर आला आहे.

Ashok Kharat Case: शेल कंपन्या आणि मनी लाँड्रिंगचा संशय

खरातच्या विविध बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जमवलेला पैसा पांढरा करण्यासाठी खरातने अनेक बनावट (Shell) कंपन्या स्थापन केल्याचा संशय ईडीला आहे. या कंपन्यांमार्फत पैसा विविध ठिकाणी वळवण्यात आला असून, मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठे 'मनी लाँड्रिंग' झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

Ashok Kharat Case: ईडीच्या तपासाला वेग येणार

अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे पोहोचले आहेत का, याचाही तपास केला जाणार आहे. त्याने जमवलेली कोट्यवधींची मालमत्ता नेमकी कशाच्या जोरावर उभी राहिली? आणि यामागे आणखी कुणाचे वरदहस्त आहेत का? हे खरातच्या चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी

दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अशोक खरात प्रकरणात रविवारी (दि. 10) तब्बल सहा तास एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकर यांची सखोल चौकशी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, अशोक खरात यांच्यासोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांना धडाधड प्रश्न विचारत विविध मुद्द्यांवर खुलासे मागितले. यानंतर माध्यमांशी बोलताना चौकशीत मी सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिली आहेत. मला विश्वास वाटतो नक्कीच त्यांचं उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना या तपासात जसं माझं सहकार्य हवं असेल ते पूर्णपणे मी सहकार्य करेन. काय प्रश्न विचारले हे अहवालातून तुम्हाला कळेल, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिलीय. 

आणखी वाचा 

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: अशोक खरातसोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या?, तेजस्वी सातपुतेंचे धडाधड प्रश्न; रुपाली चाकणकर म्हणाल्या...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saksham Tate Death Case: सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली...
सासर सोडण्यामागचं खरं कारण समोर! आंचल मामिडवारचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; ट्रोलर्सनाही दिले उत्तर, आईच्या आरोपावर म्हणाली...
Raigad Crime News: काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Solapur Crime news: जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 96 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती! नेमकं घडलं तरी काय?
Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
Bhiwandi News: जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
Embed widget