Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला नाशिक सत्र न्यायालयाने आज 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश श्रीमती बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात आजची सुनावणी झाली. या सुनावणीसाठी आरोपी अशोक खरात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता. (Ashok Kharat Case Nashik Crime)
अशोक खरातला न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद करण्यात आला. यावर आरोपीच्या वकीलांनी विरोध केला. आरोपीचा एसआयटी तपास करत आहे. त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज काय?, असा युक्तीवाद अशोक खरातच्या वकिलांनी केला. दोघांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय दिला. (Ashok Kharat Case Nashik Crime)
न्यायालयातील सुनावणीत आज काय काय घडलं? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
- श्रीमती बी एन ईचपुरानी यांच्यां न्यायालयात सुनावणी
- तपास अधिकारी ,सरकारी वकील कोर्ट रूममध्ये दाखल झाले.
- VC च्या माध्यमातून अशोक खरातला कोर्टात हजर केलं.
- भाटे वकील आपल्याकडून आले आहेत. न्यायाधीशांनी आरोपी अशोक खरातला सांगितले.
- तपास अधिकारी अमोल भारती यांच्याकडून गुन्ह्याचे स्वरूप सांगितले.
सरकारी वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
- नकली साप, वाघ दाखवून लोकांना घाबरवत होता.
- 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर अत्याचार केला.
- त्यामुळे 7 दिवस कोठडी दिली जावी.
- गरोदर महिला विधी करत होता हे सांगायचे तो विधी कोणता याचा तपास करायचा.
- नकली खडे, आणि चिंचोके मंतरुन देत होता.
- नकली साप, वाघ कुठून आणत होता याचा तपास करायचा आहे.
- महिलांना द्रव्य पेढे खाऊ घालत होता.
- त्यात काय टाकत होता कुठून घेत होता याचा तपास करायचा आहे.
- पेनड्राइव्ह जप्त केला आहे.
- लॅपटॉप जप्त केला आहे.
- त्यासाठी आरोपीला समोर बसवून तपास करायचा आहे.
- एका महिलेचा लैंगिक छळ करत होता.
- त्या महिलेने धाडस दाखवले त्यातून हे कांड समोर आले आहे.
- अनेक महिला पुढे आल्या आहेत.
- नकली खडे कोणाकडून घेत होता ते तपास करायचे आहे.
- द्रव कुठून आणत होता.
- नकली वाघ नकली साप कुठून आणत होता त्याचा तपास करायचा आहे.
- आरोपी हा हुशार आहे तो तपासात सहकार्य करत नाही त्यासाठी तपास करायचा आहे.
आरोपीचे वकील सचिन भाटे काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
- चिंचिके खडे,नकली साप नाग हे विषय याधी देखील येऊन गेले आहे.
- आरोपीचा sit तपास करत आहे. त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज काय?
- सातव्या महिन्यात महिला आरोपीला पहिल्यांदा भेटला. त्यानंतर पुन्हा त्या महिलेला अत्याचार केला आहे.
- नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 हा गुन्ह्याचा कालावधी आहे, असे म्हणतात.
- हा फिर्यादी शिर्डीमधील गुन्ह्यात आरोपी आहे.
- पहिल्या गुन्ह्यात पेन ड्राईव्ह आम्ही तयार केला व्हिडीओ आहेत, असे म्हटले होते.
- आता पुन्हा पेन ड्राईव्ह कसा रिकव्हर करणार
- आता अधिकारी बदलले आहेत आधी दोन गुन्ह्यात वेगळे आरोपी होते.
- Sit ने पत्रकार परिषद घेतली त्यात 9 गुन्हे नोंदनवले असे म्हटले 11 गुन्ह्याचा तपास sit करत आहे, असं सांगतात. त्यामुळे आता पुन्हा नवीन कोठडीची गरज नाही.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे काय म्हणाले? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
- गुन्हा फिर्यादी वेगळे आहेत. त्यामुळे अधिकारी वेगळे आहेत.
- आरोपीचे वकील जे कालावधी बाबतीत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याबाबतीत सविस्तर दिले आहे.
- कोर्टाने तपास अधिकारी ना विचारणा करतातच अधिकारींनी उत्तर दिले.
- घटना 2023 मध्ये फिर्यादी सोबत घडली पण इतर महिलांना धमकावले, अत्याचार केला. या घटना घडत होत्या त्यामुळे कालावधी मोठा आहे.
- युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी अशोक खरातला तुम्हाला काही सांगायचे आहे का?, असे विचारले.
आरोपी अशोक खरात काय म्हणाला? (Ashok Kharat Nashik District Sessions Court)
- न्यायाधीशांच्या प्रश्नावर आरोपी अशोक खरात हात जोडून नाही असं म्हणाला.
