धुळे : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कर्जाच्या व्याज परताव्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा समन्वयकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. शुभम देव असं समन्वयकाचे नाव असून धुळे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्याच्यावर कारवाई केली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड तक्रारदाराने केली. व्याजाची रक्कम परत मिळण्याकरिता त्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक शुभम देव यांची भेट घेतली. त्यावेळे शुभम देव याने तक्रारदाराकडून तब्बल पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
संबंधित व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी जिल्हा समन्वयक शुभम देव याने ही मागणी केली होती. त्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुभम देव याला तब्बल पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मुख्याधिकाऱ्यांना 6 लाखांची लाच अटक
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं बीड मध्ये मोठी कारवाई केली आहे. बीडमधील माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बीडचे जिल्ह्यातील माजलगाव नगपालिकेचे मुख्यधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना पोलिसांनी 6 लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याकंडून चव्हाण यांच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. चंद्रकांत चव्हाण यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कंत्राटदाराला 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 6 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. विशेष बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याधिकारी चव्हाण सापडले.
ही बातमी वाचा: