Anjali Damania on Rupali Chakankar: नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आज एसआयटीसमोर हजर राहणार आहेत. त्यासाठी त्या आज सकाळी पुण्याहून (Pune) नाशिककडे (Nashik) रवाना झाल्या. नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयात त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीदरम्यान एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, चौकशीवेळी रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित राहणार आहेत. एसआयटी चौकशीसाठी रवाना होताना रुपाली चाकणकर यांनी वाटेत गाडीही बदलल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुण्याहून नाशिकला निघताना रुपाली चाकणकरांनी 3 ते 4 वेळा गाडीही थांबवली. दरम्यान, या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एसआयटीकडे मोठी मागणी केली आहे. 

Continues below advertisement

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, गेले दोन महिने मी खरात प्रकरण बघत आहे. यातले अनेक खुलासे लोकांसमोर येत नाही. जी माहिती मला मिळाली. ती मी एसआयटीच्या सातपुते मॅडम यांना माहिती दिली. तेव्हा 9 महिल्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत.  एसपींकडे जगदंबा पतसंस्थेची चौकशी सुरु आहे. यात डीजींना मी पत्र लिहून विचारणा केली होती की, इतर राजकीय नेत्यांची कधी चौकशी करणार? सुनील तटकरे, रुपाली चाकणकर आणि इतरांची चौकशी झाली पाहिजे. आज रुपाली चाकणकर चौकशीला जात आहेत.  आज त्या जात असताना गाड्या बदलत आहेत.  वकिलांना घेऊन गेल्या आहेत.  एसआयटीने त्या वकिलांना बाहेर ठेवले पाहिजे आणि चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केलीय.

Anjali Damania: जे नेते अशोक खरातला भेटले त्यांनी...

अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की,  या चौकशीचे मी स्वागत करते.  अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली पाहिजे. जेवढे आर्थिक व्यवहार झालेत ते बाहेर आले पाहिजे. माझ्याकडे काल रात्री पुन्हा एकदा आणखी माहिती आली आहे.  मी लवकरच ही माहिती ईडीला देणार आहे.  कायद्याच्या वर कोणी नाही, जे नेते अशोक खरातच्या भेटीला गेले त्यांनी लिखित स्वरूपात खुलासा दिला पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

आणखी वाचा 

Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी निघाल्या, वाटेत गाडी बदलली, 3-4 वेळा थांबवली; नेमकं काय काय घडलं?