Crime News: आंध्रप्रदेशात अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या हत्येच्या प्रकरणात पोलिसांच्या हाती अनेक धागेदोरे सापडले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर महिलेनं आधी बॉयफ्रेंड पटवला. अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवले. नंतर बॉयफ्रेंडच्या भाऊजींशी सूत जुळवलं. महिलेची हत्या दोन जणांनी नियोजन करून केली आणि नंतर मृतदेह पुरला. आईच्या बाहेरख्यालीपणामुळे आता तिची दोन लहान मुले पोरकी झाली असून पोलिसांच्या तपासात आतापर्यंत अनेक पुरावे,धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
आंध्रप्रदेशातील बापटला येथील वेतापलेम मंडल येथे रमणपेटा भागात महिलेच्या हत्येने खळबळ उडाली होती.पतीच्या मृत्यूनंतर महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय महिलेची दोन आरोपींनी नियोजन करून हत्या केल्याचं समोर आलं. पतीच्या मृत्यूनंतर चुकीच्या मार्गाला लागलेल्या या महिलेबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलेचे दोन पुरुषांशी प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तिला दोन मुले आहेत.
या महिलेची अनैतिक संबधांमधून हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मृत महिला प्रमिला, रमणपेटा पंचायतीच्या विनायकपुरममधील रहिवासी होती. पतीच्या निधनानंतर तिने ईगा वेंकटेश्वर राव या पुरुषाशी अनैतिक प्रेमसंबंध होते. ईगा वेंकटेश्वर राव या इसमाच्या बहिणीचे लग्न त्याचाच जवळचा मित्र साईकुम नागाबाबू याच्याशी झाले होते. पण प्रमिलाचे नंतर ईगा वेंकटेश्वरच्या भाऊजीशी म्हणजे नागाबाबूशही प्रेमसंबंध जुळले. प्रमिलाने नागाबाबूला तिच्याशी लग्न करण्यासाठी सांगितले. मात्र, नागाबाबूने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. या परिस्थितीत तिचा पहिला प्रियकर ईगा वेंकटेश्वर आणि त्याचा भाऊजी नागाबाबू यांनी प्रमिलाला संपवण्याचा निर्णय घेतला.
नवऱ्याच्या निधनानंतर दारूचे व्यसन
नवऱ्याच्या निधनानंतर प्रमिलाला दारूचे व्यसन लागले. व्यसनाधिन झालेल्या महिलेला पंडिलापल्ली-थिमसमुद्रम रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी नेत ईगा वेंकटेश्वर आणि नागाबाबू या दोघांनी दारू पाजली. आणि तिच्या डोक्यात दारूच्या बाटलीने वार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला व मृतदेह तिथेच पुरला. काही दिवसांनी घरी येते सांगून गेलेली प्रमिला घरी न परतल्याने नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यांनतर महिलेचा मृतदेहच समोर आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला.
हेही वाचा: