Amravati Viral Video Case अमरावती : परतवाडा-अचलपूर शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी अयान अहमद तणवीर अहमदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर परतवाडा पोलीस ठाण्यात भाजप आमदार प्रवीण तायडे आणि भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी दाखल झाल्याआहेत. अश्लील व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी अयान अहमद तणवीर अहमदला अटक केलीअसूनठाणेदार सुरेश मस्के यांच्याशी भाजपचे शिष्टमंडळ चर्चा करताय. तर आरोपी मोहम्मद तनवीरला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यातआलीआहे.

Continues below advertisement

MP Anil Bonde : अटकेत असलेला युवक MIMचा कार्यकर्ता

दुसरीकडे, परतवाडा प्रकरणी अटकेत असलेला युवक MIM चा कार्यकर्ता असल्याचाआरोप खासदार अनिल बोंडे यांनीकेलाआहे. परतवाडा पोलिसांनी अश्लील व्हिडिओ प्रकरणी ज्या युवकाला ताब्यात घेतले आहे, तो एमआयएमचा कार्यकर्ता असल्याचं कळतंय. हे एकट्या मुलाचं काम नाहीये. तरहि एक मोठी गॅंग आहे. ज्यांनी संपूर्ण स्नॅप चॅट, whatsapp ग्रुप बनवले. पोलिसांनी त्या मुलांकडून मोबाईल जप्त करून त्यांचे फोन कॉल तपासावे, अशीमागणीही खासदार अनिल बोंडे यांनीकेलीआहे.

Continues below advertisement

Amravati Viral Video Case: .....तर 'त्या' आधारे रॅकेट उघड होऊ शकतो

दरम्यान, या प्रकरणात काही मुस्लिम आणि हिंदू समाजाच्या मुली देखील आहे. हे जाळं खूप मोठं पसरलेलं आहे, आणि विशेष म्हणजे चिखलदरा हॉटेलमधील पोलिसांनी सीसीटीव्ही जप्त करून सहा महिन्यातील फुटेज तपासले तर त्या आधारे रॅकेट उघड होऊ शकतो, असेहीतेम्हणाले. पोलिसांनी या प्रकरणाच्या खोलात जायला पाहिजे आणि महिला अधिकाऱ्यांनी आणि सायबर मधील अधिकारी यांची नेमणूक केली पाहिजे. अशीमागणीही खासदार अनिल बोंडे यांनीकेलीआहे.

Amravati Crime : परतवाडा प्रकरणातील आरोपी आहेतरीकोण?

परतवाडा येथील आरोपी अयान अहमद तणवीर अहमद आहे. हा परतवाडा चिखलदरा रोडवरील एका ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत आहे. त्याचे वडील परतवाडा येथे जुने ऑटो डिलींगचा व्यवसाय करतात.

अयान अहमद तणवीर अहमद याच्यावर 180 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला.

मात्र, सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीत अयान अहमद तणवीर अहमद याने 10 ते 15 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ बनवल्याचं सांगितले आहे.

यावर अजून पोलीसांनी कोणतीच माहिती दिलेली नाही. पुढेतपासाअंती ग्रामीण पोलीस अधीक्षक याप्रकरणी अधिकृत माहिती देणार असल्याचं त्यांनी स्वतः एबीपी माझाला सांगितले.

त्यामुळेयाप्रकरणी पोलीस काय खुलासा करणार? खरंच त्याने 10 ते 15 मुलींसोबत अश्लील व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल केलं का?

की खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्याआरोपाततथ्यआहे का? हेआतातपासातूनकळूशकणारआहे.

ही बातमी वाचा: