Amravati News :अमरावती (Amravati ) जिल्ह्यातील परतवाडा इथं धक्कादायक घटना घडली आहे. दोन मुली झाल्यामुळे सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ होत होता. या छळाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवलं आहे. विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवाहित महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्र्करणी पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

अचलपूर पोलिसा पती, सासू सासऱ्यांसह नणंद विरोधात गुन्हा दाखल

परतवाडा येथील साजेदा आफरीन हिचा विवाह 2 एप्रिल 2017 रोजी अचलपूर येथील सय्येद जावेद सय्येद साबीर याच्यासोबत झाला होता. 2020 मध्ये पहिली आणि 2025 मध्ये दुसरी मुलगी झाल्याने सासरच्या मंडळीतील सगळ्यांनी शारिरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. नणंद शगुफ्ता परवीन हिने तुला फक्त मुलीच होतात मी माझ्या भावाचे दुसरे लग्न लावून देते, तू आता तलाक घे अशी धमकी दिली. या सासरच्या मंडळीला कंटाळून अखेर साजेदा आफरीनने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मृतकचा भाऊ शेख वसीम मोहम्मद मोसीन यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी पती सय्येद जावेद सय्येद साबीर, सासू शाहिस्ता खातून सय्यद साबीर, सासरे सय्यद साबीर सय्यद रहीम, नणंद शगुप्ता परवीन अनवर खा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

अहिल्यानगर जिल्ह्यात हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहातामध्ये धक्कादायक घटना गडली आहे. हुंड्यासाठीच्या छळाला कंटाळून विवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. प्रिया शुभम ढगे ( वय 23 ) अस मृत विवाहितेचं नाव आहे. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांच्या मागणीसाठी सासरकडून विवाहितेचा सतत छळ सुरु होता. या प्रकरणी पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे ( सर्व राहणार को-हाळे , तालुका - राहाता , अहिल्यानगर ) यांच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करम्यात आली आहे. तिघांनांही पोलिसांनी अटक केली आहे. 

Continues below advertisement

2024 ते 2026 दरम्यान विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु असल्याची माहिती मिळत आहे. छळ सहन न झाल्याने महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.