Amravati Accident News : अमरावतीच्या वरुडमधूनएकभीषणअपघाताचीघटनाघडलीआहे. यात एसटी बस आणि ऑटोमध्ये जोरदार धडक झालीआहे. याभीषणअपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्यामाहितीआहे. वरुड तालुक्यातील राजुरा- वरुड रोडवर रेल्वे क्रॉसिंग समोर ऑटो आणि इलेक्ट्रिक बसचा हा भीषण अपघात झालाय. या अपघातात ऑटो मधील 5 जणांचा जागीच मृत्यू झालाआहे. तर 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी तिघांना नागपूर या ठिकाणी रेफर करण्यात आले आहे.
Varud Accident News : शाळकरी विद्यार्थ्यांनीसह 5 जणांचा जागीच मृत्यू, तीन प्रवासी गंभीर
मिळलेल्यामाहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत वरुड-राजुरा बाजार रोडवर एसटी बस आणि प्रवासी ऑटोचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोमधील एका शाळकरी विद्यार्थ्यांनीसह 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूर येथे हलवले आहे. एसटी बस वरुडवरून वर्धाकडे जात होती. दरम्यान, मागून एसटी बसने प्रवासी आटोला जोरदार धडक दिली.
Amravati Accident News : मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग, वरूड तालुक्यात शोककळा
हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच चेंदामेंदा होऊन त्यांचा मृत्यू झालाय. मृत्यूदेहाचे हात पाय आणि शरीराचे वेगवेगळे भाग झाले होते. तर या आटोचे दोन तुकडे झाले आहेत. एसटी बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहे तर एसटी आणि एसटी चालक यांना वरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तर घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे, या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
मृत्यु झालेल्यांची नावे (Amravati Varud Accident News)
1) माही प्रविण मांगुळकर (१३ वडेगाव)
2) कैलास घनश्याम नागदेवे (४२ वाडेगाव)
3) हरीभाउ दौलत शिंदे (८३ वघाळ)
4) चिंतामन सदाशिवराव नागदेवे (६० वाडेगाव)
Wardha News: वर्ध्याच्या आर्वीत रेबीजग्रस्त कुत्र्याचा थैमान, सहा लहान मुलांसह तब्बल 18 जणांना चावा
वर्ध्याच्या आर्वी शहरातील स्टेशन वॉर्ड परिसरात रेबीजग्रस्त कुत्र्याने हैदोस घालत सहा लहान मुलांसह तब्बल 18 जणांना चावा घेतला. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असताना गंभीर जखमी असलेल्या बालक धवल गजानन गुल्हाने वय 13 वर्ष रा. भाकरे ले आउट याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोकाट कुत्र्यांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरू लागली आहेय.
इतर महत्वाच्या बातम्या
