Ambernath Crime news: अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रुममध्ये गळ्याला दोर लावून आयुष्याचा शेवट केल्याची घटना घडलीये. या तरुणीचं ऑफिसच्या बॉससोबत अफेअर (Love Affair) होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप (Breakup) झालं होतं. यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Suicide news Ambernath)
ही तरुणी अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील मॅनेजमेंट कन्सल्टंट्स कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करत होती. या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं दोन वर्ष अफेअर होते. मात्र, दोन महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं. यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला. तो परत येईल, याची वाट बघत सिमरनने त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेने तिचे फोन न उचलल्यानं तिने नैराश्यात गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर भगवान लोटे परत आला असता तिने दरवाजा न उघडल्याने त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीने दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला, तसंच भगवान लोटे याची रात्री अडीच वाजेपर्यंत चौकशी केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
Nashik Crime news: नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण, केंद्रीय यंत्रणा तपास करणार?
नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा आता केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे. एनआयए, ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता आहे. एसआयटीकडून प्रकरणाची महत्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आल्याचे समजते. लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना वाटत आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर कंपनीतील तरुणीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला अधिकारी अस्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहेत. तर आरोपीच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अद्यापही फरार असून तिला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
आणखी वाचा
