Ambernath Crime Cat death: अंबरनाथमध्ये एका मांजरीला माथेफिरुने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता. यात मांजरीचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी मांजरीला (Cat) ढकलणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (Maharashtra Crime news)

Continues below advertisement

अंबरनाथच्या (Ambernath news) पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा इमारतीत 26 जुलै रोजी सकाळी पावणेसहा वाजता हा प्रकार घडला होता. एका व्यक्तीने डक्टच्या भिंतीवर चालणाऱ्या मांजरीला बाराव्या मजल्यावरून थेट खाली ढकलून दिलं होतं. यात मांजरीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या व्यक्तीने हे कृत्य का केलं याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. तर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्राणीमित्रांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मांजरीला ढकलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अजूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली.

या व्यक्तीचा मुलगा सोसायटीच्या कमिटीवर असून त्यामुळेच सोसायटीकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यातच सोसायटीने मृत मांजरीला परस्पर दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्राणी मित्रांनी मांजरीला पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवलं. या सगळ्या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस मांजरीला ढकलणाऱ्या व्यक्तीला अटक कधी करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

Ambernath news: पोलीस माथेफिरुच्या घराबाहेर येताच मुलगा म्हणाला....

प्राणीमित्रांच्या तक्रारीनंतर पोलीस मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरु व्यक्तीच्या घरी गेले होते. त्यावेळी या व्यक्तीचा मुलगा पोलिसांना सामोरा केला. त्याने पोलिसांनी आपले वडील आतल्या खोलीत असल्याचे सांगितले. माझ्या वडिलांचं वय 60 पेक्षा जास्त आहे, ते आताच रिटायर्ड झालेत, असे त्याने सांगितले. यावेळी मुलाने आपल्या वडिलांना मानसिक आजार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांसोबत उपस्थित असलेल्या नागरिकांना हे म्हणणे पटले नाही.  त्याने शांत डोक्याने मांजरीला खाली ढकलल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्ही व्हिडीओ बघितल्यानंतर हादरुन गेलो. ती मांजर खूप साधी होती, कोणाला त्रास द्यायची नाही. ती इमारतीच्या सगळ्या मजल्यांवर फिरायची, लिफ्टचा वापरही करायची, असे सोसायटीमधील नागरिकांनी सांगितले.

या इमारतीमधील एका तरुणाने सांगितले की, मी झोमॅटो डिलिव्हरीसाठी जाऊन परत यायचो तेव्हा मांजर माझ्यासोबत यायची. तिला मी खायला द्यायचो. 26 जुलैला ती इमारतीच्या खाली नेहमीप्रमाणे मला दिसली. त्यानंतर काहीवेळात हा प्रकार घडल्याचे तरुणाने सांगितले. ज्या प्राणीमित्रांनी पोलिसांत तक्रार दिली, त्यांनी ही मांजर गर्भवती असल्याचे सांगितले. माथेफिरुने तिला 12 व्या मजल्यावरुन ढकलल्यानंतर ती खाली एका पत्र्यावर आपटली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

आणखी वाचा

Ambernath crime: अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद