एक्स्प्लोर

माजी नगरसेविकेच्या वकिल लेकीने 10 जणांचं टोळकं आणलं, तरुणाला घरासमोरच जबर मारहाण; पोलिसांनी पाठीशी घातलं?

मंगेश मधुकर राजपूत हा अंबरनाथ पूर्व भागातील बारकू पाडा परिसरातील शिवमंदिर रोडवरील झोपडपट्टीमध्ये कुटूंबासह राहत असून त्याचा लहान भाऊ महेश सायंकाळच्या सुमारास घराजवळील रोडवरुन पायी जात होता.

ठाणे : कार चालवत वकील असलेली तरुणी घराच्या दिशेनं जात होती त्याच सुमारास एक तरुण रस्त्याने पायी जात होता. त्यावेळी त्या वकील तरुणीनं हॉर्न वाजवल्यानंतर तो तरुण बाजूला झाला. त्यावरून वाद होऊन वकील तरुणीचा पारा असा काही चढला कि तिने 10 जणांच्या टोळक्याला तलवारी आणि कोयतेसह बोलवून भर भरस्त्याच दोन तरुणांवर सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. अंबरनाथ (Thane) पूर्व भागातील बारकू पाडा परिसरातील शिवमंदिर रोडवर ही घटना घडली आहे. वकील तरुणी आपल्या भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या आईसह 10 जणांच्या टोळक्याला सोबत घेऊन परिसरात दहशद माजवली होती. या घटनेत वाद सोडविण्यासाठी आलेल्या तरुणावर तलवारीनं वार करून त्याला गंभीर जखमी केले, त्याच्यावर रुग्णालयात (Hospital) अति दक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. राजा मनोज घोरपडे असे गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे 

मंगेश मधुकर राजपूत हा अंबरनाथ पूर्व भागातील बारकू पाडा परिसरातील शिवमंदिर रोडवरील झोपडपट्टीमध्ये कुटूंबासह राहत असून त्याचा लहान भाऊ महेश हा 13 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घराजवळील रोडवरुन पायी जात होता. त्याच सुमाराला अबोली उर्फ अंकिता प्रकाश भोईर ही वकील असलेली तरुणी चारचाकी वाहनाने घरच्या दिशेनं जात होती. त्यावेळी महेश रस्त्याने पायी जात असल्याने वकील तरुणीनं हॉर्न वाजवल्याने महेश हा रोडच्या बाजुला झाला. त्यावेळी अबोली उर्फ अंकिता भोईर हिने कार बाजुला थांबवुन "तुझ्या बापाचा रोड आहे का? असे बोलून अश्लील शिवीगाळ करत बाजुने चाल ना" असे बोलण्यावरून महेश याच्याशी वाद घातला. तर, महेश तिला " तुम्ही मला शिवी का देताय, तुम्ही हॉर्न वाजविल्यावर मी रोडच्या बाजुला झालो" असे म्हटला. त्यावरून वकील अबोली भोईर हिने महेशला उलट उत्तर दिले" तू जास्त बोलत आहेस " असे बोलून  ती कारने  निघुन गेली. त्यानंतर 10 ते 15 मिनिटाने भाजपच्या माजी नगरसेविका अनिता भोईर व आबोली उर्फ अंकिता भोईर या दोघी मायलेकी  कारमधुन सुभाष पाटील याचे घराचे समोर आले, त्यांनी सुभाष पाटील यांना आवाज देत बाहेर बोलावले आणि दम दिला.  "तुमच्या पोराला माज आला का एवढा माझी पोरगी त्याला ओळखू येत नाही का?" असे बोलत असतांना दोघांमध्ये  शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी अबोली उर्फ अंकिताने तिचा मोबाईल काढून तिच्या मोबाईलमध्ये तक्रारदार मंगेशचा फोटो काढला व तुला बघुन घेतो" असे बोलून तेथुन निघून गेले. त्यानंतर 10  मिनिटाने एका बुलेटवरून हल्लखोर कुणाल बाबरे व प्रशांत भोईर तसेच एका कारमधून ओम आणि त्याचे सोबत 5 ते 6 असे दहा हल्लेखोर आले. त्या सर्वाच्या हातात तलवारी व कोयते होते हे बघून जमलेले सर्व लोक तेथून पळुन गेले. त्यावेळी, राजा मनोज घोरपडे हा मंगेशला सोडविण्यासाठी मध्ये आला असता हल्लेखोर कुणाल बाबरे याने तलवारीने राजा घोरपडे याच्यावर वार करत गंभीर जखमी केले. सद्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वकिल तरुणीवर गुन्हा नाही

या रक्तरंजित राड्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगेश राजपूत याच्या तक्रारी वरून दहा हल्लेखोर विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२) ११५(२) १८९(२) १९१ (२) १९० १९१(३) ३५२ ३५१ (३) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४२५ आणि मपोका कलम ३७१ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला मात्र ज्या वकील तरुणीला व भाजपच्या माजी नगरसेविका असलेल्या अनिता भोईर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त काळे यांच्याशी संपर्क साधला असता 10 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत एकही आरोपी अटक केला नसून सर्व आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान आगामी अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक पाहता प्रभागात आपलीच दहशत व वर्चस्व राहावे या उद्देशन हा हल्ला वकील तरुणीनं केल्याची चर्चा परिसरातील नागरिक करत आहेत. 

हेही वाचा

भाजप आमदाराचं निवासस्थान जाळण्याचा प्रयत्न; जळगावात अतिवृष्टीपीडित शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कराड पाटण मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला, परिसरात घबराटीचे वातावरण
कराड पाटण मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यावर मारला डल्ला, परिसरात घबराटीचे वातावरण
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
NEET पेपरफुटी प्रकरण! RCC पुन्हा सुरु होणार का? विद्यार्थी संभ्रमात, पालकांसमोरही आर्थिक आणि मानसिक संकट 
NEET पेपरफुटी प्रकरण! RCC पुन्हा सुरु होणार का? विद्यार्थी संभ्रमात, पालकांसमोरही आर्थिक आणि मानसिक संकट 
पुढे काय होणार? NEET पेपरफुटीनंतर RCC क्लासमधील विद्यार्थी-पालक संभ्रमात, आर्थिक आणि मानसिक संकट
पुढे काय होणार? NEET पेपरफुटीनंतर RCC क्लासमधील विद्यार्थी-पालक संभ्रमात, आर्थिक आणि मानसिक संकट

व्हिडीओ

Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद सर्वकाही नाही; मी जनतेचा आवाज - मुनगंटीवार
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Embed widget