Ambarnath Latest Crime News : हॉस्पिटल मधील रुग्णांना कोंडवले, त्यानंतर आया आणि नर्स यांचे मोबाईल हिसकावून घेतले.. अन् डॉक्टरच्या घरावर तब्बल एक कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ पूर्व भागात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.
अंबरनाथ येथील कानसई भागातील उषा नर्सिंग होम येथील डॉक्टर हरीश आणि उषा लापसीया यांच्या घरावर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकलाय. चोरट्यांनी डॉक्टरांच्या घरातून हिरे आणि सोन्याचा असा तब्बल सवा कोटी रुपयांचा ऐवज दरडोखरांनी लंपास केलाय. रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान चार दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. दरोडेखोर पहिले हॉस्पिटलमध्ये घुसले आणि रुग्णांना धमकावले, चाकूचा धाक दाखवले, आणि लुटपाट केली, रात्री साडे अकराच्या सुमारास चार दरोडेखोर हॉस्पिटलमध्ये घुसले आणि त्यांनी हॉस्पिटल मधील आया आणि नर्स चे मोबाईल काढून घेतले.
त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर डॉक्टरांच्या घराकडे गेले. ते डॉक्टरच्या घरामध्ये घुसले. यावेळी तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत त्यांनी डॉक्टरांच्या घरातील डिझिटल तिजोरी त्याचबरोबर सीसीटीव्हीचा डीव्हीआर घेऊन हे दरोडेखोर लंपास झाले. तिजोरीत तब्बल सवा कोटी रुपयांच्या किंमतीचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने होते. डॉक्टर दाम्पत्यांना चाकूचा धाक दाखला. त्यानंतर दरोडेखोरांना घाबरत त्यांनी तिजोरीचा पत्ता दिला. दरोडेखोरांनी तिजोरी घेऊन कारमध्ये बसून पसार झाले.
या दरोड्याची माहिती मिळताच रात्री उशिरा मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. सध्या पोलिसांकडून या दरोडाच्या तपास सुरू आहे, मात्र प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिलाय. पोलिसांच्या हाती काही धागेद्वारे लागल्याची माहिती मिळते आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अंबरनाथ सारख्या वर्दळीच्या ठिकाणी हा दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.