अकोला : जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू आणि माजी अभियंता संजय कौसल यांची हत्या करण्यात आली आहे. महेंद्र पवार असं आरोपीचं नाव असून त्याने 60 वर्षीय संजय कौसल यांची हत्या केली. संजय कौसल हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंते म्हणून निवृत्त झाले होते. अकोल्यातल्या रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलं. अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement


महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामीनावर बाहेर होता.  त्याने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली आहे. 


संजय कौसल हे अकोल्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. नवे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे.


Akola Sanjay Kausal Murder : आरोपी जामिनावर बाहेर


मारेकरी महेंद्र पवार याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची असून त्याने या आधीही एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. त्या प्रकरणात तो जामीनावर तुरुंगाबाहेर आला होता. मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौसल हे रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. एका जुन्या वादातून ही हत्या झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली.


ही बातमी वाचा: