अकोला : जिल्ह्यातील पातुर तालुक्यात 10 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी 60 वर्षीय जगराम आडे याला अखेर अकोला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी दोन दिवसांपासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या संयुक्त कारवाईत जंगल परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आलं.

Continues below advertisement

पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मोठं सर्च ऑपरेशन राबवलं होतं. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकाने दोन दिवस सातत्याने शोधमोहीम सुरू ठेवली होती. अखेर आलेगावच्या जंगल परिसरातून आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं.

Akola Crime News : आई-वडील शेतात गेल्यानंतर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. ते कामासाठी बाहेर गेल्यानंतर शेजारी राहणाऱ्या 60 वर्षीय आरोपीने संधी साधून चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील चार ते पाच दिवसांपासून आरोपी वारंवार अत्याचार करत होता.

Continues below advertisement

भीतीपोटी मुलगी सुरुवातीला काहीच बोलत नव्हती. मात्र आई-वडिलांनी विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

Patur Assault Case : आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपी जगराम आडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू ठेवली होती. अखेर जंगल परिसरात लपून बसलेल्या आरोपीला अटक करण्यात आली.

दरम्यान, या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

Maharashtra Crime Update : राज्यभरातून संताप

राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत असतानाच अकोल्यातील ही घटना समोर आली आहे. आरोपीच्या अटकेनंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ही बातमी वाचा: