Akola Municipal Corporation Election Result 2026 : अकोल्यात निवडणुक निकालानंतर 16 जानेवारीला अकोटफैल भागात भाजपच्या दोन गटांत राडा झाला होता. यात भाजपचे प्रभाग क्रमांक 2 ब मधील नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकरांवर (Sharad Turkar) प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यानआता हा हल्ला करणाऱ्यांना पडकण्यात आलंय. नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर प्रभाग क्रमांक 2 ड मधील भाजपचे पराभूत (Akola Result 2026) उमेदवार नितीन राऊतसह अन्य एकाने हा जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तूरकर आणि राऊत यांचे समर्थक आमनेसामने येत मोठी दगडफेक झाली होती. तर अनेक वाहनांची तोडफोड झाली होती. या दरम्यान समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. अखेर पोलिसांनी हल्लेखोर नितीन राऊतसह अन्य एकाला अटक केलीये. (Akola Election Result 2026)
Akola Congress: दिवंगत काँग्रेस नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल हत्याकांड, आरोपी संजय बोडखे, राजीव बोचे काँग्रेसमधून निलंबित
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते हिदायत पटेल हत्याकांड प्रकरणात संशयीत आरोपी संजय बोडखे व राजीव बोचे यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अकोटच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असल्यामुळे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये निलंबीत करण्यात येत आहे, असे पत्र काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी काढले आहे. त्याची प्रत अकोला जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांना पाठवली आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपींपैकी उबेद पटेल हा एकच आरोपी अटकेत. इतर पाच आरोपी अद्यापही फरार. इतर आरोपींमध्ये काँग्रेस नेते आणि अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेसनेते आणि मादी जिल्हा परिषद सभापती राजीव बोचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बद्रूजम्मा यांचा समावेश.
Akola Result 2026: अकोल्यात ठाकरे सेनेचे विजयी उमेदवारानं फेडला अनोखा नवस, दिड किलोमीटर घातलं लोटांगण
अकोल्यात महापालिका निवडणुकीच्या निकालात विजयाच्या सिलेब्रेशन्सचे अनेक रंग आणि ढंग पहायला मिळालेत. मात्र, अकोल्यात एका उमेदवाराच्या विजयोत्सवाचं एक अनोखं आणि भावनिक रूप पहायला मिळालंय. प्रभाग क्रमांक 12 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सागर भारूका 325 मतांनी विजयी झालेत. त्यांनी भाजपचे सलग दोनदा नगरसेवक राहिलेल्या अजय शर्मांचा पराभव केलाय. याआधी सागर भारूका यांचा या प्रभागात सलग दोनदा अत्यल्प मतांनी पराभव झाला होताय. मात्र, या विजयानंतर त्यांनी देवाचं अनोख्या पद्धतीनं आभार मानलंय. त्यांनी टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरापासून तर थेट निमवाडीतील खाटू श्याम मंदिरापर्यंत चक्क लोटांगण घातल देवाचे आभार मानलेय. या दोन मंदिरातील अंतर दिड किलोमीटर आहे. यावेळी त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत होते. रात्री १ वाजता खाटूश्याम मंदिरात त्यांच्या या लोटांगण यात्रेचा समारोप झालाय.
इतर महत्वाच्या बातम्या
