Akola Crime News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल (Congress Leader Hidayat Patel) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवीमृत्यूझालाआहे. हिदायत पटेल यांच्यावर काल (6 जानेवारी) अकोल्यात जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला (Akola Crime) केला होता. राजकीय आणि कौटूंबिक वादातून उबेद पटेल या तरूणाने हिदायत पटेल यांच्यावर हल्ला केल्याचीमाहितीआहे. त्यांनतरमारेकरी फरार असूनसंशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. मात्रआज अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान हिदायत पटेल यांनीअखेरचा श्वास घेतलाय.
2019 मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिदायत पटेल यांचं गाव असलेल्या मोहाळा गावात राजकीय वादातून भाजप कार्यकर्ते मतीन पटेल यांची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह 10 आरोपी होते. हत्या करणारा आरोपी उबेद हा हत्या झालेल्या मतिन यांचा पुतण्या आहे. हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यापदावरकार्यरतहोते. मात्रत्यांच्यायामृत्यूच्याबातमीनेराजकीयवर्तुळातशोककळा पसरलीआहे.
मशिदीत नमाज पाडून बाहेर पडताचप्राणघातकहल्ला
हिदायत पटेल हे काल (मंगळवारी) दुपारच्या दोन वाजताच्या नमाजनंतर मोहाळा गावातील मशिदीत नमाज पाडून बाहेर येत असताना उबेदने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला आहे. पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर वार केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्रहल्ल्यातजबरमारलागल्यानेत्यांचीप्रकृतीगंभीर असल्याचेडॉक्टरांनीसांगितलंहोतं. मात्रअखेरउपचारादरम्यानआजत्यांची प्राणज्योत मालवली आहे.
कोण आहेत हिदायत पटेल?
-सध्या प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष. अकोल्यातील काँग्रेसचा मोठा मुस्लिम चेहरा-पटेल 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार. -पटेल 2014 मध्ये दुसर्या स्थानावर. तर 2019 मध्ये तिसर्या स्थानावर. -हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते. 25 वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक. -सध्या अकोट तालूका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष. -35 वर्षांपासून जिल्ह्यातील महत्वाच्या अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि सध्या संचालक.
महत्वाच्या बातम्या :
