Akola Crime News : अकोल्यात दारुच्या वादामधून काकानेच पुतण्याला ठार केलंय. यामध्ये थेट पुतण्याची दगडाने ठेचून हत्या (Akola Crime) करण्यात आली आहे. कुणाल किशोर कमलाकर असे हत्या (Crime News) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जास्तच प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. त्यातूनच झालेल्या वादातून काकाने कुणालची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. मात्र किरकोळ वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत काकानं पुतण्यालाच जिवानिशी संपवल्याच्या घटनेनं अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement


 मृतदेह घरात लपवला पण..; हत्येच्या घटनेनं अकोल्यात खळबळ! 


पुढे आलेल्या माहितीनुसार, सुनील कमलाकर असं मारेकरी काकाचं नाव आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी सुनील कमलाकर याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कुणाल बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात 4 दिवसांपूर्वी दाखल होती. मात्र, त्यानंतर अकोल्यातील पेन्शनपुरा भागात काकाच्याच घरात कुणालचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तपासादरम्यान काकानेच पुतण्याची ही हत्या केल्याचं उघड झालंय. या प्रकरणात खदान पोलीस अधिक तपास करतायेत. 


 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीच्या शोधात पोलिसांचं पथक रवाना


अकरा वर्षाय चिमुकली स्वतःच्या घरासमोर खेळत असताना त्याचं वार्डात राहणाऱ्या 30 वर्षीय इसमानं तिला बळजबरीनं उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आरोपीनं पळ काढला. ही घटना 16 मेला भंडाऱ्याच्या तुमसर शहरात घडली. त्यानंतर आरोपीनं पीडितेच्या कुटुंबियांना धमकी दिल्यानं पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र, याप्रकरणी काल (30 मे ) पीडितेच्या कुटुंबीयांनी तुमसर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन सहारे (वय 30 वर्ष) याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, या प्रकरणातील आरोपी फरार असून तुमसर पोलिसांचं पथक त्याच्या शोधात रवाना करण्यात आलं आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शिवाय राज्यात एकीकडे महिला अत्याच्याराच्या घटना घडत असताना चिमुकल्या लेकीही सुरक्षित नाही का? असा सवाल ही आता विचारला जाऊ लागला आहे.    


इतर महत्वाच्या बातम्या