एक्स्प्लोर

Akola Crime : MIMच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अकोल्यातील आकोटमध्ये राजकीय गालबोट

Akola Crime News : अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.

Akola Crime News : अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एमआयएमच्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेच्या प्रभाग 15 च्या नगरसेवक पदाच्या महिला उमेदवार उज्वला तेलगोटे यांच्या पतीवर आज सकाळच्या सुमारास जीवघेणा हल्ला झालाय. राजेश तेलगोटे असे जखमी झालेल्या उमेदवाराच्या पतीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून निवडणुकीच्या प्रचारच्या शेवटच्या दिवसा गालबोट लागल्याचे बघायला मिळालं आहे.

Akola Crime News : अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार,  मॉर्निंग वॉकवरून घरी परतीच्या प्रवासात असताना अज्ञात तीन जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. हल्ल्याची माहिती समजतात तेलगोटे यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे. दरम्यान याप्रकरणी अकोट शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूये. मात्र, या घटनेने अकोटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजेश तेलगोटे हे एमआयएमचे नगरसेवक पदाचे उमेदवार उज्वला तेलगोटे यांचे पती आहेत. राजकीय वादातून तेलगोटे यांच्यावर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. आज नगरपालिका प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, दिवसाच्या सुरुवातीलाच हा हल्ला झाल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली आहे.

काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर शाही फेकण्याची घटना; बुलढाण्यात मतदानापूर्वी तणावपूर्ण शांतता

बुलढाणा शहरातील तेलगूनगर परिसरात आज सकाळी काँग्रेस नगरसेवकाच्या प्रचार बॅनरवर अज्ञात व्यक्तींनी शाही फेकल्याची घटना उघडकीस आली. निवडणुकीच्या आदल्या दिवशी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाही फेकण्यामागील हेतू, तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

उद्या मतदान; प्रशासन सतर्क

उद्या सकाळपासून नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होत आहे. मतदानापूर्वीच घडलेल्या या अप्रिय प्रकारामुळे निवडणूक प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याची सूचना दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
Gondia Crime News: हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?
हातावर लिहून मागितली लाच, पण डाव फसला! भाजप नगराध्यक्षाला ACB ने रंगेहाथ पकडलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Embed widget