एक्स्प्लोर

Akola Crime : दिव्या खालीच अंधार! चक्क रेल्वे अन् कृषी विद्यापीठाच्या जागेत गांजाची लागवड; अकोला पोलिसांची मोठी कारवाई,

Akola Crime : अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वेच्या जागेत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून चक्क चोरी छुपी गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Akola Crime News : अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातल्या रेल्वेच्या जागेत आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला लागून चक्क चोरी छुपी गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. अकोल्यातल्या एमआयडीसी पोलिसांना याचा सुगावा लागला असता त्यांनी थेट कारवाई करत हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.  

अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड

राज्यात गांजा लागवडीवर कायद्याने पूर्णतः बंदी आहे. मात्र, तरीही चोरी छुप्या पद्धतीनं गांजाची लागवड केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अकोल्यातही गांजा लागवड केल्याचा प्रकार समोर आलाय. काही अज्ञातांनी अकोल्याच्या कृषी नगर परिसरातल्या रेल्वेच्या जागेत थेट गांजाची लागवड केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी या ठिकाणी कारवाईत संपूर्ण गांजाची झाडे उध्वस्त केलेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भिंतीला लागून आणि अकोला-नांदेड रेल्वे रुळाच्या जागेत या गांजाची लागवड करण्यात आली होती. एमआयडीसी पोलिसांची जवळपास 3 तास ही कारवाई सुरु होती.

गांजाची लागवड करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरू

अखेर, पोलिसांनी ही संपूर्ण गांजाची झाडे उखडून टाकली आहे. मात्र गांजा लागवड कुणी केलाय? याचा सुगावा अद्याप हाती लागला नाही. तरीही पोलिसांचा त्या दिशेने तपास सुरुये. परंतु या कारवाईनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. ऐन अकोला शहरातल्या गजबजलेल्या वस्तीतील रेल्वे रुळाच्या जागेत गांजा लागवड होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होतायेत.

धारदार शस्त्रांसह एकाला अटक, दुसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू

घातपात करण्याच्या इराद्यानं शस्त्रसाठा घरात लपवून ठेवणाऱ्या एकाला भंडाऱ्याच्या साकोली पोलिसांनी धारदार शस्त्रांसह अटक केली. पोलीस येताच दुसरा आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या कारवाईत साकोली पोलिसांनी तलवार, चाकू, गुप्ती, कोयता, हॉकीस्टिक आणि काही दारूचा साठाही जप्त केला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून साकोली इथं प्रॉपर्टीच्या वादातून मोठा घातपात करणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी गाठून ही कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही कारवाई साकोलीच्या गणेश वार्ड इथं केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओडिसा राज्यातील दिनेश अग्रवाल (४४) याचा समावेश असून अशोक अग्रवाल हा फरार झाला असून साकोली पोलीस त्याचा शोध घेत आहे.

हे ही वाचा 

Ajit Pawar in Baramati: अजितदादांचा बारामती दौरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत, कट्टर विरोधकाच्या मेळाव्याला लावणार हजेरी?

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या, 3 नॉन एसी लोकल नव्यानं  सुरु  
मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार, 19 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर 12 एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
IND vs PAK : भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला...
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
Embed widget