Ahilyanagar Shrirampur Crime : अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधून (Shrirampur Crime News) एकखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. यात कौटुंबिक वादानेहिंसेचंटोक गाठलं असून मुलानेचआपल्याजन्मदात्या पित्याचा खून केल्याचीघटनाघडलीआहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात हि धक्कादायक घटना घडलीआहे. 1 मेच्या रात्री साडे आकारा वाजेच्या दरम्यान हि घटना घडल्याचीमाहितीआहे. यात कौटूंबिक वादातून मुलाने वडीलांवर चाकूने वार करतहिहत्याकेलीआहे. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने पित्याचा दुर्दैवी मृत्यु झालाआहे. मुसा हसन बागवान असं 65 वर्षीय मयत इसमाचे नाव असूनयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीआहे. (Shrirampur Crime Case News)
दरम्यान, आरोपी मुलगा आशपाक बागवान ( वय 30 ) यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतपुढीलकारवाईसुरुकेलीआहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊनपुढीलकारवाईसुरुकेलीआहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्रकिरकोळकारणातूनजन्मदात्यावडिलांचीहत्याकेल्यानेपरिसरातमोठीखळबळउडालीआहे.
Crime : गोदामातून तब्बल 1745 कोटींची कोकेन जप्त; ‘ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक’मधून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एका कारवाईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा मोठा भंडाफोड केला आहे. ‘ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक’ अंतर्गत NCB ने तब्बल 349 किलो उच्च प्रतीची कोकेन जप्त केली असून तिची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1 हजार 745 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भिवंडीतील गोदाम पट्ट्यांमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद हालचाली पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या गुप्त तपास आणि तांत्रिक निगराणीनंतर NCB च्या पथकाने नवी मुंबईतील कलंबोली परिसरात MH-03-DV-3803 क्रमांकाची सुपर कॅरी गाडी अडवली. तपासणीदरम्यान क्रिकेट पॅड आणि ग्लोव्हजमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेले 136 किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्यानंतर आरोपींच्या चौकशीतून भिवंडीतील रेहनाल गावातील एका गोदामाचा तपास लागला. NCB ने तत्काळ छापा टाकत त्या ठिकाणाहून आणखी 213 किलो कोकेन हस्तगत केली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, ही कोकेन मशीनच्या आतील गुप्त कप्प्यांमध्ये लपवून भारतात आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. भिवंडीतील विस्तीर्ण वेअरहाऊस नेटवर्कचा वापर करून हे आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट कार्यरत असल्याचा संशय NCB ने व्यक्त केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोठ्या कारवाईबद्दल NCB पथकाचे अभिनंदन करत ड्रग्स माफियांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
