Ahilyanagar News : अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस हवालदार शाम सुंदर गुजर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिरूर येथे केलेल्या अमली पदार्थांच्या कारवाईत गुजर याचा सहभाग असल्याने गुजरयांना बडतर्फ करण्यातआलं. अमली पदार्थांच्या केलेल्या कारवाईत पोलीस (Ahilyanagar Police) हवालदार गुजर यांस पुणे ग्रामीण पोलिसांनी 18 जानेवारीला अटक केली होती. दरम्यान, पुणे पोलिसांचा (Pune Police) अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर (Ahilyanagar News) पोलीस अधीक्षकांनी हि बडतर्फची कारवाई केलीआहे.

Continues below advertisement

दरम्यान, पोलीस हवालदार गुजर याने मुद्देमाल कक्षात जमा असलेला अमली पदार्थ त्याच्या साथीदाराच्या मार्फत विकल्याचा आरोप होता. आरोपानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाची तपासणी करून पंचनामा केला होता. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाई एकूण पाच जण अटकेत असून त्यात पोलीस हवालदार गुजरचाही समावेश आहे. परिणामीपुणे पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी हि बडतर्फची कारवाई केलीआहे.

Kolhapur News : कोल्हापुरातील कसबा बावडा मातंग वसाहतीत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी 

Continues below advertisement

कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मातंग वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये काठ्या आणि तलवारीचाही वापर केल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं होतं. या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या हाणामारीचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आल आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी देखील दाखल करण्याचं काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.

Gondia Crime : रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक; कुर्ला एक्स्प्रेसमध्ये कारवाई

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाने 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत रेल्वे गाड्या आणि परिसरात प्रतिबंधित द्रव्ये, दारू व तंबाखू उत्पादनांच्या तस्करीविरुद्ध सतत तपासणी मोहीम सुरू केली आहे. या अभियानांतर्गत आरपीएफ गोंदिया पोस्ट व जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कुर्ला एक्स्प्रेस मधून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पकडले. लकी बंजारे जि. राजनांदगाव व प्रेमदास करें  यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याजवळ गोंदिया राजनांदगावचे जनरल तिकीट सापडले. त्यांची बॅग तपासली असता त्यात देशी दारूचा 31 पव्यांचा साठा, एकूण 2 लिटर 790 मिलि दारू आढळून आली... याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करत कारवाई केली आहे.

ही बातमी वाचा: