Beed Ambajogai Crime : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात एकअतिशय धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. तालुक्यातील एका गावात अवघ्या 2 वर्षाच्या मुलीचा 17 मार्च रोजी पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तपासणी करत असताना तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. परंतु कुटुंबीयांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती. यानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक बाब समोर आली. एका 15 वर्षीय मुलाने इंटरनेटवरील अश्लील व्हिडिओ पाहून या मुलीला आपल्या घरी नेत अत्याचार केल्याचं तपासात समोर आले. यानंतर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पिंक पथकाचे अधिकारी करत आहेत.
Beed Accident News: भीषण अपघात: हायवाच्या धडकेने कारने पेट घेतला; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू
बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली. खडीने भरलेल्या भरधाव हायवाने कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे कारने अचानक पेट घेतला आणि त्यामध्ये असलेल्या पती-पत्नीचा बाहेर पडता न आल्याने होरपळून जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई तालुक्यातील एक दांपत्य आपल्या कारमधून बीडच्या दिशेने जात होते. याच वेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवाने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला.
मदत मिळेपर्यंत होत्याचे नव्हते झाले: कारने पेट घेतल्याने आत असलेल्या पती-पत्नीला दरवाजा उघडून बाहेर पडता आले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि मदतीसाठी लोक धावण्यापूर्वीच दोन्ही प्रवाशांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे.
Crime News : नोकरीचे आमिष दाखवून महिलेला लाखोंचा गंडा; पैसे मागितल्याने टोळक्याकडून बेदम मारहाण
नाशिकच्या जेलरोड परिसरातील शिवाजीनगर भागात एका महिलेची नोकरीच आमिष दाखवून फसवणूक करून तिलाच बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर परिसरातील 32 वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवणाऱ्या आलं. संशयितांनी महिलेकडून एक लाख रुपये उकळले. मात्र मार्च महिना संपत आल्याने घरगुती गरजांसाठी महिलेने आपले पैसे परत मागितले असता संशयितांनी पैशांऐवजी महिलेला बेदम मारहाण करत थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेने दिलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
