चंद्रपूर : राज्यातील पेपरफुटीच्या (Paper Leak) घटनांवरुन सध्या राज्यभर संताप व्यक्त होत असून नुकतेच 22 मार्च रोजी घेण्यात आलेल्या MPSC परीक्षेचाही (Exam) पेपर फुटल्याचं आता सिद्ध झाला आहे. सरकारने ती परीक्षा रद्द केली असून नव्याने उमेदवारांना परीक्षा द्यावी लागणार आहे. याप्रकरणी, आत्तापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे चंद्रपुरात बोगस गुणपत्रिकेची घटना समोर आली आहे. विविध विद्यापीठाच्या बनावट गुणपत्रिका आणि पदवी रॅकेटचा चंद्रपुरात (Chandrapur) पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस गुणपत्रिका प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र देण्याबाबत पैशांची मागणी केल्याचा आरोप एका रिक्षाचालकाने केला होता. त्यानंतर, हे प्रकरण चांगलंच गाजलं. त्यावर, विद्यापीठाने माहितीही दिली. आता, पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला हादरविणाऱ्या एका मार्कशीट आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी वैभव सोनूले नामक एका आरोपीस अटके करण्यात आली असून रॅकेटचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. मुख्य सूत्रधार मूळ चंद्रपूरचा असून सध्या राज्याच्या विविध भागात वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. 

पोलिसांनी या आरोपींकडून 2 आलिशान वाहने जप्त केली आहेत. आरोपींनी लाभार्थ्यांकडून प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवी यासाठी 5 ते 10 लाख रु. घेतले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलीस तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून आरोपींची एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता असल्याचे दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, संतोष शेवगावकर यांनी म्हटले. आधीच नोकरीत असलेल्या आणि बढतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी देखील या आरोपींकडून सर्वाधिक उच्च पदव्या मिळविल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, या घटनेने शैक्षणिक आणि प्रशासकीय नोकर वर्तुळ मात्र हादरले आहे.

Continues below advertisement

हेही वाचा

MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी; निकालात प्रेयसी पास, प्रियकर नापास, चिडलेल्या बॉयफ्रेंडची थेट तक्रार, असा झाला उलगडा