एक्स्प्लोर

1 लाखाची लाच, केबिनमध्ये आढळले रोख 6 लाख; पोलीस निरीक्षकासह PSI ला 5 दिवसांची एसीबी कोठडी

फिर्यादी वकीलाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मुंबई : राज्यातील अनेक खात्यातील भ्रष्टाचार (Bribe) गेल्या काही महिन्यांत समोर येत असून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, अशी भावना प्रत्येकाची आहे. काही दिवसांपूर्वी चक्क मंत्रालयातच अन्न व औषध विभागाच्या कार्यालयातील लिपिकास लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून संबंधित लिपिक अटकेत आहे. त्यातच, आता मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये एसीबीनं (ACB) मोठी कारवाई केली. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला (PSI)  लाच घेताना अँटी करप्शनने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

फिर्यादी वकीलाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम आज घेताना एसीबीच्या टीमने दोन्ही पोलिसांना रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे या पोलिसांच्या कॅबिनमध्ये लाखोंची रोकडही आढळून आली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात कारवाईत अटक करण्यात आलेल्या कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराविरोधातील फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या  तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांनी तीन लाखांची लाच मागितली होती. बुधवारी करण्यात आलेल्या सापळा कारवाईत 1 लाखांची स्वीकारल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 

6 लाख 34 हजार रोकड सापडली

याप्रकरणातील आरोपी संजीव तावडे हे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर ज्ञानेश्वर जुन्ने पोलीस उप-निरीक्षक असून त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची दाट शक्यता व्यक्त करत सखोल तपास करण्यासाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची एसीबीची मागणी होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेवेळी पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये 6 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर केबिनमध्ये झाडाझडती घेण्यात आली होती. या झाडाझडती दरम्यान 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम एसीबीला सापडली आहे. 

हेही वाचा

... ते कुठेही गेले तरी हाताला काही लागणार नाही; जयकुमार गोरेंनी शिंदे भेटीवरुन मोहिते पाटलांना डिवचलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वसईत नवजात बालिकेला सोडलं रस्त्यावर, आंतरराष्ट्रीय महिला दिनीच धक्कादायक घटना, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Crime News: नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
नातवाचा आजीवर अत्याचार, शरीराचे चावे घेऊन संपवलं, हादरवून टाकणारी घटना
Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
Pandharpur News: पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ झालेला व्हायरल, नेमकं काय घडलेलं?
पंढरपुरात ट्रक चालकास मारहाण करणाऱ्या अन् 3 हजार घेणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांचे निलंबन; व्हिडीओ झालेला व्हायरल, नेमकं काय घडलेलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Embed widget