Abhishek Ghosalkar Firing: अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.  मॉरिस नोरोन्हा  (morris noronha) यानं अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवरुन प्रशिक्षण केल्याचं पोलीस तपासात समोर आलेय.  मॉरिस नोरोन्हा यानं बंदूक कशी चालावयची, याबाबत यूट्युबवर सर्च केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेय. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून  मॉरिस नोरोन्हा यानं गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे. 


मॉरिस नोरोन्हा यानं साडी पाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवलं होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह दरम्यान घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर स्वत:वरही त्यानं गोळी झाडून आत्महत्या केली. यासाठी मॉरिस नोरोन्हा यानं बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीचा वापर केला होता. पोलिसांनी अमरेंद्र मिश्रा याला बेड्या ठोकल्या आहे. त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 


डिसेंबरमध्येच हत्येचा कट - 


अमरेंद्र मिश्राच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, "मिश्राला कामाची गरज होती. दोन महिन्यापूर्वी  मॉरिस नोरोन्हा यांनी त्यांना कामाची ऑफर दिली. पण कामावर ठेवण्यापूर्वी शस्त्र ऑफिसमध्ये ठेवून जाण्याची अट घातली होती. त्यानुसार, डिसेंबर 2023 मध्ये ते  मॉरिस नोरोन्हा यांच्या कार्यालयात रजू झाले. त्यांना प्रति महिना 40 हजारांचा पगार दिला जात होता." यावरुन  मॉरिस नोरोन्हा यानं डिसेंबरमध्येच भिषेक घोसाळकर याच्या हत्येचा कट रचल्याचं समोर येतेय. 


अमरेंद्र मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - 


अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अमरेंद्र मिश्रा हा 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत होता. त्याला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे. हत्येच्या कटातून अमरेंद्र मिश्रा याला काही फायदा झाला का? याचा पोलीस तपास करत आहेत. त्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. सरकारी वकिलांनी तसा युक्तीवाद केला. पण याला मिश्राच्या वकिलांनी विरोध केला. मिश्राने आतापर्यंत पोलिस तपासा सहकार्य केेले आहे. त्यांना सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे पोलीस कोठडी सुनावण्यात येऊ नये, असा युक्तीवाद मांडला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अमरेंद्र मिश्राला पोलीस कोठडी देण्यास नकार दिला. मिश्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 


गोळीबार प्रकरण नेमकं काय?


मॉरिस दहिसर-बोरिवली परिसरात एनजीओ चालवायचा. परिसरात मॉरिसची स्वयंघोषित नेता म्हणून ओळख होती. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.अभिषेक घोसाळकरांनी नोरोन्हा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हा दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी घट्ट मैत्री देखील झाली होती. त्यानंतर  दोघं सोबत फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह संपत आलं असताना मॉरिसनं गोळ्या झाडल्या.


 


आणखी वाचा :


 Morris Noronha: बलात्काराच्या आरोपात जेल, थंड डोक्यानं गोळीबार, कोण आहे मॉरिस भाई?