बीड :मुंबईत लाच लुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने धाड टाकून महापालिकेतील एका सुपरवायजरला रंगेहात अटक केली होती. 40 हजारांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यात एसीबीच्या कारवाईचा धडाका पाहायला मिळत असून अनेक सरकारी नोकरदार लाच घेताना जाळ्यात अडकत आहेत. आता, बीड जिल्ह्यातही आज मोठी खळबळ उडवणारी कारवाई झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर, विभागीय वन अधिकाऱ्यास त्यांच्याच घरी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. बीडमधील (Beed) या कारवाईने जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबल उडाली आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार दोन दिवसीय बीड दौऱ्यावर असून आज त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यासंमवेत, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी, जिल्हा विकासाच्या दृष्टीने त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीला उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यास काही तासांतच लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. श्रीनिवास लखमावाड असे लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुनेत्रा पवार यांच्यासमवेतची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार हे त्यांच्या निवासस्थानी परतले. याच ठिकाणी त्यांनी तब्बल 45 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. पूर्वनियोजित सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराविरोधात मोठा संदेश गेल्याची चर्चा आहे.
