एक्स्प्लोर

Crime News: 36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले अन्...; ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं!

Crime News: पत्नीनेच मारेकऱ्यांना सर्व माहिती पुरवली असल्याचं तपासात समोर आलं आहे.

सातारा : कौटुंबिक वाद व अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पतीला (Crime News) पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 36 वर्षीय पत्नीचे पंचवीस वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध (Crime News) होते, त्यात अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला कॉन्ट्रॅक्ट किलरकडून संपवल्याचं समोर आलं आहे, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पत्नीनेच मारेकऱ्यांना सर्व माहिती पुरवली असल्याचं तपासात समोर आलं आहे.(Crime News)

ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले या कराड येथील अभियंत्याच्या खुनाचा उलगडा झाला आहे.अभियंत्याच्या पत्नी, मेव्हुण्यानंतर आता अल्टो गाडीखाली चिरडणाऱ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलरना कराड पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने आपला 25 वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात याला तीन लाखाची सुपारी दिली होती. प्रियकराने आपला साथीदार आकाश होनसुरे यांच्या मदतीने अभियंता लक्ष्मण मंडले याला क्रूरपणे चिरडले. या खून प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून कॉन्ट्रॅक्ट किलराना पत्नीने माहिती पुरवली होती. (Crime News) 

Crime News:  नेमकं काय घडलं?

जलसंधारण विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या खुनाच्या प्रकरणात पत्नीसह मेहुण्यास ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणातील प्रत्यक्ष कारने लक्ष्मण मंडले यांना चिरडून ठार मारून फरार झालेल्या पत्नीच्या प्रियकरासह साथीदारास कराड पोलिसांनी रविवारी (ता ७) रात्री उशिरा अटक केली आहे. या प्रकरणात पत्नीने प्रियकराशी असलेल्या प्रेमसंबंधातून व पतीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासातून ३ लाख रुपये देऊन पतीला ठार मारण्याचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी प्रियकर प्रथमेश प्रकाश थोरात, (वय २५, रा. कार्वे, ता. कराड), साथीदार आकाश अशोक होनसुरे, (वय २३, रा. कल्पतरु कॉलनी, श्रीराम अपार्टमेंटजवळ, थोरात हॉस्पिटलजवळ, कार्वे नाका, ता. कराड) अशी आणखी दोघांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी याप्रकरणी लक्ष्मण मंडले यांची पत्नी सारिका आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) हे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. शहापूर (जि. ठाणे) येथे नोकरीस असलेल्या मंडले यांचा ६ जून रोजी पहाटेच्या वेळी कराडमध्ये कारने चिरडून खून करण्यात आला. या प्रकरणी आरोपी पत्नीकडून चौकशी केली त्यानंतर घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व पुराव्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला.

Crime News:  पत्नीचे अन् २५ वर्षीय तरूणाचे २०२३ पासून प्रेमसंबंध

तपासादरम्यान पोलिसांनी मृताची पत्नी सारिका लक्ष्मण मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना अटक केली आहे. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सारिका मंडले हिची २०२३ साली कापड दुकानात प्रथमेश थोरात याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीतून पुढे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले.

तर पतीला संपवसाठी प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याचा साथीदार आकाश होनसुरे याच्यासोबत कराडातून एक कार घेतली. ५ जूनच्या रात्री लक्ष्मण मंडले हे ठाणेहून कराडकडे येत असल्याची माहिती त्यांनी पत्नीला दिली होती. पहाटेपासून पत्नीने त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या हालचालींची माहिती घेतली. हीच माहिती तिने आपल्या प्रियकराला पुरविली. कोल्हापूर नाका परिसरात उतरून पायी घरी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना संपवलं.

 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget