Crime News: 23 वर्षांचा प्रियकर अन् 34 वर्षीय विवाहित प्रेयसी, हॉटेलच्या रूम नंबर 205 मध्ये प्रेमाचा थरारक शेवट, पोलिसांनी दरवाजा तोडला अन्...
Jhansi Crime News: झाशीमधील एका हॉटेलमध्ये प्रेमप्रकरणामुळे एका जोडप्याने विष प्राशन केले. मृत 23 वर्षीय तरूण हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता, तर ती महिला विवाहित असून एका मुलाची आई होती.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील झाशी येथील नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'हॉटेल रॉयल इन'मधील रूम नंबर २०५ मध्ये एका प्रेमी युगुलाने विषारी(Crime News)पदार्थ प्राशन करून आत्महत्या (Crime News) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवराज यादव (२३ वर्षे) आणि भारती (३४ वर्षे) अशी मृतांची ओळख पटली आहे. युवराज हा चिरगावमधील औपारा गावचा रहिवासी होता, तर भारती टहरौलीची रहिवासी होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉटेलच्या खोलीचा दरवाजा तोडून दोघांना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल (रविवारी, ता १०) दुपारी घडली, दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.(Crime News)
Crime News: हॉटेलच्या खोलीत मृत अवस्थेत आढळले प्रेमी युगुल
हॉटेल रॉयल इनमधील कर्मचाऱ्यांना जेव्हा खोलीत काहीच हालचाल जाणवली नाही, तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस क्षेत्राधिकारी लक्ष्मीकांत गौतम यांच्या नेतृत्वाखाली पोहोचलेल्या पथकाने जेव्हा रूम नंबर २०५ चा दरवाजा तोडला, तेव्हा आतील दृश्य भयावह होते. युवराज आणि भारती बेशुद्धावस्थेत पडले होते. पोलिसांनी तातडीने दोघांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, परंतु विष शरीरात पसरल्यामुळे डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.(Crime News)
Crime News: शेजारी राहणाऱ्या महिलेशी प्रेमसंबंध जुळले अन्...
मृत युवराजचे वडील जयपाल आणि चुलते कमल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज बीए पास झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यांच्या घराशेजारीच भारती आपल्या पती आणि मुलासह राहत होती. भारतीच्या मुलाचे युवराजच्या घरी येणे-जाणे होते, ज्यामुळे भारतीचाही त्यांच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. याच काळात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, याची पुसटशी कल्पनाही दोघांच्या कुटुंबाला नव्हती. रविवारी सकाळी युवराज घराबाहेर पडला होता आणि दुपारी त्याच्या मृत्यूची बातमी आली, अशी माहिती युवराजचे वडील जयपाल आणि चुलते कमल सिंह यांनी दिली.
Crime News: ब्लॅकमेलिंग अन् षडयंत्र असल्याचा आरोप
युवराजच्या कुटुंबीयांनी भारतीवर गंभीर आरोप केले आहेत. ३४ वर्षीय भारतीने त्यांच्या २३ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याला ब्लॅकमेल करून त्रास देत होती, असा दावा त्यांनी केला आहे. या महिलेनेच युवराजला हॉटेलवर बोलावले आणि त्याला आधी विष पाजले, त्यानंतर स्वतः विष प्राशन केले, असा संशय युवराजच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलीस हॉटेलमधील रेकॉर्ड आणि कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे तपास करत आहेत.





















