Zomato share Price : झटपट फूड डिलिव्हरी म्हणून ओळख असलेली झोमॅटो कंपनी सध्या अडचणीत आहे. याचं कारण, झोमॅटोची शेअर बाजारात सतत घट होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झोमॅटोच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांहून कमी घट झाली आहे. झोमॅटोचा स्टॉक बीएसईवर 92 रुपयांवरून 18 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग साईट्समध्ये 25 टक्क्यांहून जास्त झोमॅटोची घसरण झाली आहे. त्यामुळे एकंदरच झोमॅटोसाठी हा खूप मोठा लॉस झाला आहे. 


आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी शेयर मार्केटची कमजोर सुरुवात झाली. सेन्सेक्स 1.20 टक्क्यांनी घसरून 58,329 च्या पातळीवर त्याचा व्यवहार सुरु आहे. तर, निफ्टीही 1.33 टक्क्यांच्या घसरणीसह 17,392.45 च्या पातळीवर आहे.


झोमॅटोची आयपीओ IPO शानदार सुरुवात
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असणारा झोमॅटो गेल्या वर्षी जुलैमध्ये स्टॉक एक्सचेंजवर त्याची नोंद करण्यात आली होती. Zomato चा IPO 13 जुलै ते 16 जुलै 2021 पर्यंत वाटपासाठी खुला होता. 76 रुपयांपासून त्याच्या ऑफर किंमतीपासून सुरुवात होऊन 52 टक्क्यांच्या प्रीमियमवर हा शेअर 116 रुपयांवर उघडला. हा स्टॉक बीएसई (Bombay stock exchange) वर 51 टक्क्यांच्या वाढीसह 115 वर याची नोंद झाली होती. 
सध्या झोमॅटो 25% च्या घसरणीने 94 रुपयांच्या जवळपास व्यवहार करत आहे. Zomato च्या दृष्टीने ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.


मार्केटची कमकुवत सुरुवात
मार्केट एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, जागतिक शेअर बाजारांचा आलेख हा पूर्णपणे घसरला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच स्टॉक शेअर्सवर मंदी आहे. गेल्या आठवड्यात टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. बाहेरच्या देशांतील शेयर्समध्येदेखील मंदी होती. झटपट फूड डिलिव्हरीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश विक्री नॉन-प्रॉफिट बेस स्टॉक्समध्ये होत आहे. त्यामुळे झोमॅटोवरही हा स्टॉक घसरणीचा परिणाम झाला आहे.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha