YouTube Earning Tax नवी दिल्ली : सध्या कंटेंट क्रिएटर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यूट्यूबवर कंटेंट क्रिएट करुन आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. यूट्यूबवरुन कमाई करण्यासाठी संबंधित यूट्यूबरच्या चॅनेलला 1 हजार सबस्क्रायबर्स असले पाहिजेत आणि 365 दिवसांमध्ये त्यानं यूट्यूब पार्टरनर प्रोग्रॅमचा भाग असणं आवश्यक आहे. यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅमचा भाग झाल्यानंतर कमाई सुरु होते. एखाद्या यूट्यूब चॅनेलची कमाई 100 डॉलर्स झाल्यानंतर ती बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मात्र, यूट्यूबवर मिळणारं उत्पन्न करपात्र असतं हे अनेकांना माहिती नसतं. त्यासंदर्भातील माहिती जाणून घेऊयात.

Continues below advertisement

यूट्यूबवरुन होणाऱ्या कमाईवर किती कर लागणार हे ते उत्पन्न त्याला इतर स्त्रोतांपासून मिळणारं उत्पन्न, व्यापार किंवा व्यवसायातून उत्पन्न यावर ते अवलंबून आहे. बहुतांश प्रकरणात त्याला बिझनेस मानलं जातं आणि त्यावर आयकर अधिनियम 1961 च्या तरतुदी लागू होतात. 

यूट्यबकडून मिळणारं उत्पन्न 1 कोटी पेंक्षा कमी असेल तर करदात्याला सामान्य कर प्रक्रियेप्रमाणं आर्थिक रेकॉर्ड ठेवायला लागतं. त्याला कर लेखापरिक्षणाची आवश्यकता नसते. मात्र, 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास कलम 44 AB नुसार कर ऑडिट करणं आवश्यक आहे. यामध्ये चॅनेल मालकाला सीएच्या माध्यमातून ऑडिट करावं लागतं. निव्वळ करपात्र उत्पन्न व्यापार खर्च आणि डिप्रिशिएशन कमी करुन निश्चित केला जातो. 

Continues below advertisement

यूट्यूबवरील जाहिरातीतून मिळमाऱ्या उत्पन्नावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. यामध्ये 9 टक्के सीजीएसटी आणि 9 टक्के एसजीएसटी लागू असतो. यासाठी यूट्यूबरला रजिस्ट्रेशन करावं लागतं. 

जीएसटी भरावा लागतो का?

यूट्यूब अॅडसेन्सकडून मिळणारं उत्पन्न करपात्र असतं. त्याच्यावर देखील कर लागू होतो. मात्र, केंद्र सरकारनं सध्या 12 लाखांपर्यंतंच उत्पन्न करमुक्त ठेवलं आहे, त्यापेक्षा उत्पन्न अॅडसेन्समधून मिळालं असेल तर कर लागत नाही. मात्र,यूट्यूबवरील उत्पन्न 20 लाखांपेक्षा अधिक असल्यास जीएसटी नोंदणी करावी लागते. ब्रँड स्पॉन्सरशिप, डोमेस्टिक अफिलिएशन कमिशन,मर्चंडाईज सेल्स, ऑनलाईन कोर्स सेल्स यासाठी 18 टक्के जीएसटी आकारला जातो. 

यूट्यूबवरुन कमाई होत असल्यास कोणता आयटीआर फॉर्म निवडायचा?

पूर्णवेळ यूट्यूबर्स आणि क्रिएटर्सला आयटीआर-3 आणि आयटीआर-4 सुगम अर्ज भरावे लागतात. आयटीआर फाईल करताना गरजेनुसार सीएची मदत घेणं आवश्यक आहे.