Highest Paid CEO  : जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांचा पगार करोडो रुपये आहे. पण तुम्हाला माहित आहे का? जगातील टॉप 10 सर्वाधिक पगार घेणारे सीईओ कोण आहेत? आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओबद्दल माहिती सांगणार आहोत. या सीईओंचा पगार जाणून तुम्हाला धक्का बसेल. या सीईओंना दररोज कोट्यवधी रुपयांचा पगार मिळतो. या सीईओंना पगाराव्यतिरिक्त अनेक सुविधाही मिळतात. दरवर्षी पगारात लक्षणीय वाढ होते.


एलन मस्क जगातील सर्वाधिक पगार घेणारे CEO 


टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ आहेत. एलन मस्कला वर्षाला सुमारे 10.1 अब्ज डॉलर पगार मिळतो. भारतीय रुपयानुसार ते अंदाजे 82000 कोटी रुपये आहेत.


टिम कुक


अॅपल कंपनीचे CEO टिम कुक यांचा वार्षिक पगार सुमारे 64,700 कोटी रुपये आहे. सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंच्या यादीत टीम कुक दुसऱ्या स्थानावर आहे.


रॉबर्ट स्केअरिंग


रिव्हियन ऑटोमोटिव्ह सीईओ रॉबर्ट स्केअरिंगचा (RJ Scaringe) पगार 2.3 अब्ज डॉलर आहे. भारतीय रुपयांनुसार ते सुमारे 18 हजार कोटी रुपये आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंच्या यादीत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.


थॉमस सिबेल


थॉमस सिबेल हे C3.AI चे CEO आहेत. थॉमस सर्वाधिक पगार असलेल्या सीईओंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. त्यांचे वार्षिक वेतन सुमारे 2812 कोटी रुपये आहे.


सुई नेबी


सुई नेबी या Coty च्या CEO आहेत. सुईच्या वार्षिक पगाराबद्दल बोलायचे तर त्यांचा पगार सुमारे 283 दशलक्ष डॉलर्स आहे. जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या लोकांमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे.