Deepak Shenoy : सध्या 90 तास काम करण्याच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. L&T चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. या वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होतेय. अशातच आता यामध्ये आणखी एका व्यवसायिकाने उडी घेतली आहे. CapitalMind चे संस्थापक आणि CEO दीपक शेनॉय यांनी मी तर आठवड्यात 100 तास काकाम केल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर ट्वीट देखील केलं आहे.
खरे काम अनेकवेळा 4 ते 5 तासातच पूर्ण होते
दीपक शेनॉय यांनी एका पोस्टमध्ये व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अनुभव शेअर केला. ते म्हणाले की मी आठवड्यात 100 तासांपेक्षा जास्त काम करतो. परंतू खरे काम अनेकवेळा 4 ते 5 तासातच पूर्ण होते. यावेळी त्यांनी केलेल्या तासांच्या संख्येबद्दल नाही, परंतु त्या तासांदरम्यान कामाची तीव्रता आणि लक्ष याबाबात वक्तव्य केलं आहे.
दीपक शेनॉय यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत आठवड्यातून 100 तास काम केले असेल, परंतु त्यापैकी बहुतेक काम एक व्यावसायिक म्हणून होते. तुम्हाला कामाचे तास लागू करण्याची गरज नाही, जे लोक प्रेरित आहेत ते आनंदाने काम करतील. कोणत्याही परिस्थितीत, बहुतेक खरे काम दिवसातील 4 ते 5 तासांत होते, परंतु ते केव्हा होते हे आपल्याला माहिती नाही. मला अजूनही मीटिंगला काम म्हणणे अवघड वाटत आहे. पण मी ज्याला काम म्हणतो त्यापेक्षा जास्त ऊर्जा लागते. काही प्रमाणात कामाचे तास हे तर्क माझ्यासाठी अनाकलनीय आहे. जेव्हा मी काम करतो तेव्हा मी कठोर परिश्रम करतो असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
रविवारचे नाव बदलून 'सन-ड्युटी' करा : हर्ष गोयंका
काही उद्योजकांनी दर आठवड्याला 80 ते 90 तास काम करण्याच्या कल्पनेचे समर्थन केले, तर काहींनी 90 तासांच्या कामाच्या आठवड्याच्या संकल्पनेवर चिंता व्यक्त केली. आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी ट्वीटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की आठवड्यातून 90 तास? रविवारचे नामकरण 'सन-ड्युटी' करुन 'सुट्टी' ही पौराणिक संकल्पना का करू नये? मी कठोर आणि हुशार काम करण्यावर विश्वास ठेवतो, परंतु आयुष्याला एका शाश्वत ऑफिस शिफ्टमध्ये बदलू शकतो? असं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: