watermelon Production : आता हळूहळू उन्हाचा चटका वाढू लागला आहे. या उन्हाच्या चटक्याच टरबूज (watermelon) आणि खरबुजाला मोठी मागणी असते. उन्हाळ्याच्या काळात टरबुजाची लागवड करुन शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. दरम्यान, टरबूज उत्पादनात अग्रेसर कोणतं राज्य आहे, हे तुम्हाला माहितेय का? देशातील पाच राज्यात टरबुजाचे 70 टक्के उत्पादन होते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


टरबूज उत्पादनात उत्तर प्रदेशचा हिस्सा हा 21.91 टक्के


उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी टरबुजापेक्षा चांगला पर्याय नाही.पण तुम्हाला माहित आहे का टरबूज कोणत्या राज्यात सर्वात जास्त तयार होतो. म्हणजेच, जेथून बहुतेक टरबूज संपूर्ण देशात पोहोचतात. तर उत्तर प्रदेश हे टरबुजाचे सर्वात जास्त उत्पादन करणारे राज्य आहे. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात टरबुजाचे उत्पादन घेतात. देशातील एकूण टरबूज उत्पादनात उत्तर प्रदेशचा हिस्सा हा 21.91 टक्के आहे.


टरबुजाच्या उत्पादनात आघाडीवर असलेली राज्ये कोणती?


टरबूज हे झैद हंगामातील मुख्य पीक आहे, त्याची लागवड फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होते. उत्पादनाच्या बाबतीत आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशाच्या एकूण टरबूज उत्पादनात या राज्याचा वाटा 19.49 टक्के आहे. टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात खास फळ आहे. हे त्याच्या गोड चवसाठी ओळखले जाते. त्यात 90 टक्क्यांहून अधिक पाणी आढळते. उत्पादनाच्या बाबतीत, भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. तामिळनाडू टरबूजाचे 9.77 टक्के उत्पादन घेतले जाते. तर कर्नाटक हे टरबुजाच्या उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे. या राज्यातील शेतकरी दरवर्षी 8.9 टक्के टरबुजाचे उत्पादन करतात. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार, ओडिशा टरबूज उत्पादनात पाचव्या क्रमांकावर आहे. ओडिशात दरवर्षी शेतकरी 7.86 टक्के टरबूजाचे उत्पादन करतात. दरम्यान, या पाच राज्यांमध्ये मिळून 70 टक्के टरबूजाचे उत्पादन होते.


नगदी पीक म्हणून टरबुजाची लागवड क


शेतकरी नगदी पीक म्हणून टरबुजाची लागवड करतात. उन्हाळी हंगामात बाजारात टरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच या फळामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. देशात हळूहळू उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. उन्हाळ्यात थंड पेयांनी जशी मागणी असते, तशीच टरबूज आणि खरबुजाला देखील मोठी मागणी असते. उन्हाळ्याच्या काळात शेतकरी टरबुजाची लागवड करुन चांगला नफा मिळवू शकतात. कारण उन्हाळ्याच्या काळात टरबुजाला मोठी मागणी असते. तसेच टरबुज के आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं फळ आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Most Expensive Watermelon : जगातील सर्वात महाग कलिंगड, लाखोंच्या किमतीला विक्री; यामध्ये एवढं खास काय? जाणून घ्या...