PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana). या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्याला वर्षाला 6 हजार रुपयांचा निधा देत आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ते जमा झाले आहेत. दरम्यान, 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. पण लवकरच 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळण्याची शक्यता
2019 मध्ये भारत सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. तेव्हापासून केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते जारी केले आहेत. योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षातून तीन वेळा 2000 चे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात 6000 दिले जातात. त्याचा 16 वा हप्ता येणे बाकी आहे. दरम्यान, चालू महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान योजनेचा 16 हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरमध्ये 15 वा हप्ता आला होता
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 15 हप्ते देण्यात आले आहेत. 15 वा हप्ता गेल्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. नोव्हेंबरपासून एकूण 4 महिने उलटले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत हप्ता निघेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन तपासू शकता. या वेबसाईवर PM किसान योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
जर तुम्ही अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर तुम्ही अजूनही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जाऊन नवीन शेतकरी नोंदणी निवडावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या समोर दिलेल्या पेजवर आवश्यक माहिती भरण्यास सांगितले जाईल. ती माहिती भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो प्रविष्ट केल्यानंतर, तुमच्या आधार कार्डवर नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची या योजनेसाठी नोंदणी केली जाईल.
महत्वाच्या बातम्या: