मुंबई : स्वत:च्या करियरची सुरुवात करणे रोमांचक आहे. तुम्ही स्वतःचे पैसे कमावत आहात आणि तुम्हाला आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल तर चांगलेच आहे. पण पैसे खर्च करण्याचा मोह असला तरीही, बचतीची सवय लावून घेतल्याने दीर्घकाळासाठी मोठा फरक पडू शकतो. बजाज फायनान्स मुदत ठेवी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) तरुण व्यावसायिकांना त्यांचा संपत्ती-उभारणीचा प्रवास सुरू करण्यासाठी एक स्मार्ट मार्ग उपलब्ध करून देते.

बजाज फायनान्स’च्या वतीने देऊ करण्यात येणाऱ्या एफडीचे प्रकार

बजाज फायनान्स गुंतवणुकदारांच्या विविध गरजा लक्षात घेऊन दोन प्राथमिक प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझीट (एफडी) म्हणजेच types of Fixed Deposits (FDs) उपलब्ध करते:

संचयी एफडीः या प्रकारात तुमचे व्याज मुद्दलासह वेळोवेळी पुन्हा गुंतवले जाते. यामुळे चक्रवाढ वृद्धी शक्य होते. याचा फायदा तुम्हाला अधिकाधिक परतावा मिळण्यास मदत होते. परिपक्वता कालावधीनंतर संपूर्ण जमा केलेली रक्कम मिळते. लक्षणीय संपत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन गुंतवणुकदारांसाठी संचयी पद्धतीची एफडी (क्युम्युलेटीव्ह एफडी) आदर्श आहे.

विना-संचयी एफडीः हा पर्याय नियमित व्याज भरणा प्रदान करतो. तुम्ही तुमच्या गरजांना साजेशी वारंवारता (मासिक, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक) निवडू शकता. त्यांच्या गुंतवणुकीतून नियमित उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्यांसाठी गैर-संचयी एफडी (नॉन-क्युम्युलेटीव्ह एफडी) हा एक चांगला पर्याय आहे.

बजाज फायनान्स एफडी एक स्मार्ट पर्याय का ठरतो?

उच्च परतावाः तुम्ही कष्टाने कमावलेल्या पैशाचे भले झाले पाहिजे. आज उपलब्ध पर्यायांपैकी बजाज फायनान्स सर्वोच्च एफडी व्याजदर म्हणजेच highest FD interest rates देते. जेणेकरून 60 वर्षांखालील ग्राहकाला दरसाल 8.60% पर्यंत कमाई करणे शक्य असून ज्येष्ठ नागरिक आणखी सर्वोच्च दरांचा - वार्षिक 8.85% पर्यंत - आनंद घेऊ शकतात.

डिजिटल सुविधाः कागदपत्रांच्या कामकाजासाठी वेळ नाही का? बजाज फायनान्स एफडी संकेतस्थळाद्वारे किंवा अॅपद्वारे पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने हाताळता येते आणि व्यवस्थापित केली जाऊ शकते. जी तुमच्या व्यस्त जीवनाला अगदी साजेशी आहे.

तुमच्या उद्दिष्टानुरूप: बजाज फायनान्स’च्या वतीने लवचिक कालावधी (12 ते 60 महिने) देऊ करण्यात येतो. अल्प मुदतीची सुट्टी किंवा डाऊन पेमेंटसाठी बचत करा किंवा दीर्घ मुदतीच्या एफडीसह दीर्घकालीन संपत्ती-उभारणी जास्तीत जास्त करा.

उत्पन्न किंवा वाढः आवश्यक असल्यास उत्पन्नाची पूर्तता करण्यासाठी किंवा मजबूत चक्रवाढ वाढीसाठी व्याज पुन्हा गुंतवण्यासाठी भरणा पर्याय (मासिक, तिमाही, अर्धवार्षिक, वार्षिक किंवा परिपक्वता) निवडा.

सिद्ध विश्वासार्हताः बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे निव्वळ उच्च दर नाही. त्यांचे उच्च पतमानांकन ([ICRA] AAA (Stable) आणि CRISIL AAA/STABLE) आहे.

संपत्ती निर्माण करण्यासाठी मुदतठेव (एफडी) कशी मदतीची ठरते

बचतीची सुरुवात लवकर केल्याने तुमच्या भविष्यावर लक्षणीय परिणाम होतो. एफडी कशाप्रकारे मदतीची ठरू शकते ते पहा:

आपत्कालीन निधीः अनपेक्षित खर्चांसाठी एफडी हे तुमचे सुरक्षित जाळे असू शकते, त्यामुळे तुम्हाला कर्जावर अवलंबून राहण्याची गरज नाही.

डाऊन पेमेंटः एफडीद्वारे बचत केल्याने तुम्ही घर किंवा कार खरेदीच्या तुमच्या स्वप्नाच्या अधिक जवळ येऊ शकता.

आर्थिक उद्दिष्टेः मग ते पुढील शिक्षण असो, प्रवास असो किंवा व्यवसाय सुरू करणे असो, एफडी तुम्हाला त्या उद्दिष्टांपर्यंत स्थिरपणे पोहोचण्यात मदत करते.

दीर्घकालीन वाढः तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकाच तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल. याचा अर्थ तुमच्या व्याजावर व्याज मिळते, परिणामी कालांतराने घातांकीय वाढ होते.

बजाज फायनान्स एफडी विरुद्ध पारंपरिक पोस्ट ऑफिस बचत खाते

                             पैलू                बजाज फायनान्स फएडी                 पोस्ट ऑफिस बचत खाते
व्याजाचा दर वार्षिक 8.85% पर्यंत वार्षिक 4%
परिपक्वता 12-60 महिने N/A
किमान जमा रक्कम रु. 15,000 रु. 500
कमाल जमा रक्कम रु. 5 कोटी कोणतीही कमाल मर्यादा नाही

एफडी कॅलक्युलेटर: माहितीपूर्ण गुंतवणूक नियोजनाचे साधन

तुमच्या एफडी गुंतवणुकीचे हुशारीने नियोजन करण्यासाठी एफडी कॅल्क्युलेटर हे एक महत्त्वाचे साधन म्हणून काम करते. गुंतवणुकीचे तपशील प्रविष्ट करून संभाव्य परतावा सहजपणे निर्धारित करण्यात हे तुम्हाला मदत करू शकते.

बजाज फायनान्स एफ. डी. कॅल्क्युलेटर वापरण्याच्या पायऱ्याः

  1. बजाज फिनसर्व्हच्या संकेतस्थळाला किंवा अॅपला भेट द्या
  2. एफडी कॅल्क्युलेटर शोधा
  3. तुमची पसंतीची गुंतवणूक रक्कम, कार्यकाळ, व्याज भरणा, वारंवारता आणि ग्राहक प्रकार (वरिष्ठ नागरिक किंवा 60 वर्षे वयाहून कमी) प्रविष्ट करा
  4. अंदाजित परतावा लगेच पहा

निष्कर्ष

तुमच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एक मजबूत आर्थिक पाया तयार करणे तुम्हाला भविष्यातील यशासाठी तयार करते. बजाज फायनान्स एफडी तरुण व्यावसायिकांना बचत तसेच गुंतवणूक सुरू करण्यासाठी एक सुरक्षित, लवचिक आणि फायदेशीर मार्ग उपलब्ध करून देते. ताबडतोब सुरुवात करून, अगदी छोट्या रकमांसह, तुम्ही तुमच्या आर्थिक भवितव्याचे नियंत्रण हातात घेऊ शकता.

Disclaimer 

This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised.