Beautiful places in India : सध्या देशात उन्हाचा (Heat) चटका चांगलाच वाढल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी तापमानाचा (Temperature) पारा 40 अंशावर गेला आहे. अशातच तुम्ही जर कुठे फिरायला जायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी काही अशी काही उत्तम ठिकाणं आहेत, जिथं तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल. दरम्यान, या विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी तुम्ही रेल्वेने प्रवास करा ( Traveling by Train). कारण रेल्वे प्रवासात तुम्हाला प्रवासाचा मस्त आनंद घेता येईल. जाणून घेऊयात या ठिकाणांबद्दल सविस्तर माहिती. 


या प्रवासासाठी तुम्ही रेल्वेचा पर्याय निवडा. कारण तुम्ही ज्या ठिकाणांना जाणार आहात, त्या ठिकाणी तुम्ही जर रेल्वेने प्रवास केला तर तुम्हाला चांगला आनंद मिळेल. कारण ज्या मार्गाने तुम्ही प्रवास करणार आहात ते मार्ग रेल्वे प्रवासासाठी सुंदर आहेत. 


पठाणकोट ते हिमाचलमधील जोगिंदर नगर 


पंजाबमधून हिमाचल प्रदेशला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेचा वापर करु शकता. पंजाबमधील पठाणकोटमधून हिमाचल प्रदेशमधील जोगिंदरनगर या ठिकाणी तुम्ही रेल्वेने प्रवास करा. या मार्गावर तुम्हाला प्रवासाचा सुखद आनंद मिळेल. कारण, या ठिकाणी प्रवासादरम्यान, तुम्हाला सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते. 


शिमला


उन्हाळ्याच्या दिवसात फिरण्यासाठी शिमला हे एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी जाताना तुम्ही कालका ते शिमला असा रेल्वे प्रवास केल्यास तुम्हाला सुंदर नजारा पाहायला मिळेल. भारतातील सुंदर रेल्वे मार्गापैकी हा एक मार्ग आहे.  


जम्मू ते बारामुल्ला


जम्मू काश्मीर हे देखील रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. तुम्हाला रेल्वे प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर जम्मू ते बारामुल्ला या मार्गाने प्रवास करा, तुमचा आनंद द्वीगुणीत करा. येथील पर्यटन अविस्मरणीय आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला या ठिकाणी थंड वातावरणाचा अनुभव मिळेल.


कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम


उन्हाळ्याच्या काळात तुम्ही कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम असा रेल्वने प्रवास करु शकता. या ठिकाणी तुम्हाला प्रवासाचा मनसोक्त आनंद घेता येईल. भारतातील सुंदर रेल्वे प्रवासापैकी हा एक प्रवास आहे. या प्रवासादरम्यान, तुम्हाला अरबी सुमद्र पाहायला मिळेल. 


उटी 


उन्हाळ्यात अनेकजण उटीला फिरायला जातात. हे एक थंड हवेचे ठिकाण आहेत. उटीला जाताना तुम्ही मेट्टुपालयम ते उटी दरम्यान रेल्वे प्रवास करुन गेल्यास तुम्हाला सुंदर नजारा पाहायला मिळेल. या प्रवासादरम्यान, तुम्हाला सगळीकडे हिरवाई आणि गर्द झाडी, डोंगर पाहायला मिळतील.


महत्वाच्या बातम्या: