Valentine Day : आज व्हॅलेंटाइन डे (Valentine Day) आहे. हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री झाली. विशेषत: गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी असते.  ही मागणी देशातच नाही तर परदेशातही आहे. भारतात (India) सर्वाधिक गुलाबाची लागवड कर्नाटकात केली जाते. येथून गुलाबाचा पुरवठा देशातच नव्हे तर परदेशातही केला जातो. 


व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं लोक त्यांच्या प्रेमाला गुलाबाची फुले किंवा गुलाबाचा पुष्पगुच्छ देतात. त्यामुळं व्हॅलेंटाईन वीकमध्ये म्हणजे 14 फेब्रुवारीपर्यंत गुलाबांना चांगली मागणी असते. ही मागणी देशातच नाही तर परदेशातही आहे. भारतात सर्वाधिक गुलाबाची लागवड कर्नाटकात केली जाते. त्यामुळे तेथून देशातच नव्हे तर परदेशातही गुलाबाचा पुरवठा केला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एकट्या बंगळुरु विमानतळावरुन सुमारे 3 कोटी गुलाब पाठवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 108 टक्के अधिक आहे.


गेल्या वर्षीच्या तुलनेत गुलाबाच्या मागणीत 108 टक्क्यांची वाढ 


बंगळुरु विमानतळ चालवणाऱ्या कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी व्हॅलेंटाईन डेला 29 दशलक्ष गुलाब पाठवण्यात आले, त्याचे एकूण वजन 1,222,860 किलो आहे. गेल्या वर्षी या विमानतळावरून 15.4 दशलक्ष गुलाब पाठवण्यात आले होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 108 टक्के अधिक गुलाब पाठवण्यात आले आहेत. सुमारे 3 कोटी गुलाबांच्या काड्यांपैकी दोन कोटी गुलाब भारतीय शहरांमध्ये तर 90 लाख गुलाब परदेशात पाठवण्यात आले आहेत.
सिंगापूर-मनिला येथे आणखी गुलाब पाठवले आहेत.


बंगळुरुच्या गुलाबांना देश-विदेशात मोठी मागणी 


बंगळुरुच्या गुलाबांना देश-विदेशात मोठी मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 14 टक्के अधिक गुलाब परदेशात पाठवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही 148 टक्के अधिक गुलाब भारतीय शहरांमध्ये पाठवण्यात आले आहेत. परदेशात गुलाबांची सर्वाधिक खेप क्वालालंपूर, सिंगापूर, कुवेत, मनिला आणि शारजा येथे गेली. देशांतर्गत विमानतळांपैकी दिल्ली, कोलकाता, मुंबई, गुवाहाटी आणि जयपूर ही अशी ठिकाणे आहेत जिथे व्हॅलेंटाईन डेच्या आधी बंगळुरुहून गुलाब पाठवले जात होते.


BlinkIt वर प्रत्येक मिनिटाला 350 गुलाब ऑर्डर प्राप्त 


BlinkIt या ऑनलाइन वितरण प्लॅटफॉर्मवर दर मिनिटाला 350 गुलाबांच्या ऑर्डर प्राप्त होतात. BlinkIt चे मालक अलबिंदर धिंडसा यांना दिलेल्आ माहितीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी त्यांनी चॉकलेट्स आणि गुलाबांची विक्रमी डिलिव्हरी करण्यात आली.


महत्वाच्या बातम्या:


'या' गुलाबाच्या किमतीपुढे मर्सिडीज, ऑडी आणि BMW सुद्धा स्वस्त; कोट्यवधी रुपयांचं गुलाब तुम्ही पाहिलंय का?