UPI Charge Rules Updates : युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या शुल्काबाबत पसरलेल्या अफवा आणि व्यापारी वर्गातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या केवळ व्यापारी (P2M) व्यवहारांवरच मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) लागू होऊ शकतो. तर सामान्य नागरिकांमधील आपापसातील व्यवहार (P2P Person to Person) नेहमीप्रमाणे पूर्णपणे मोफतच राहणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरिक आणि लहान व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
UPI Free Transactions : 96 टक्के व्यवहार पूर्णपणे मोफत!
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांचा विचार करता:
लहान व्यवहार पूर्णपणे मोफत : 96 टक्के UPI मर्चंट (P2M) व्यवहार हे 2,000 रुपयांपेक्षा कमी रकमेचे असतात. त्यामुळे या सर्व व्यवहारांवर शून्य टक्के शुल्क लागू असून ते पूर्णपणे मोफत आहेत.
केवळ 4 टक्के व्यवहारांवर परिणाम : 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मोठे खरेदी व्यवहार केवळ 4 टक्के असतात. त्यामुळे या निर्णयाचा थेट फटका कोणत्याही लहान व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला बसणार नाही.
एमडीआर (MDR) कोणासाठी?
डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणारे मोठे व्यापारी आधीपासूनच 1 ते 2 टक्के MDR शुल्क भरत आहेत. आता हाच नियम UPI द्वारे मोठ्या रकमेचे पेमेंट स्वीकारणाऱ्या मर्चंट्सवर लागू केला जाऊ शकतो.
P2P vs P2M Difference : P2P आणि P2M मधील फरक काय?
P2P (Person to Person) : तुम्ही मित्र, नातेवाईक किंवा कोणत्याही व्यक्तीच्या बँक खात्यावर कितीही रक्कम पाठवली, तरी त्यावर एक रुपयाही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे.
P2M (Person to Merchant) : जेव्हा तुम्ही दुकानात, शॉपिंग मॉलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना मर्चंट क्यूआर (QR) कोडवरून 2,000 रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे पेमेंट करता, तेव्हा हे शुल्क ग्राहकांकडून नव्हे तर संबंधित व्यापाऱ्याकडून (MDR स्वरूपात) आकारले जाते.
No UPI Charge On Customers : ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त भार नाही
अनेक मर्चंट्स डिस्काउंट आणि ईएमआय (EMI) ऑफर्स देऊन ग्राहकांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देतात. त्यामुळे 2,000 रुपयांवरील व्यवहारांवर लागणारे हे संभाव्य शुल्क व्यापारी स्वतः सहन करतात, ग्राहकांकडून ते वेगळे वसूल केले जात नाहीत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन UPI वापरावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.
ही बातमी वाचा:
