Share Market: संसदेत आज निर्मला सीतारमण यांनी बजेट सादरीकरणाला सुरुवात करताच त्याचा प्रभाव शेअर मार्केटवर झाल्याच दिसून आलंय. बजेटला सुरुवात होताच सेन्सेक्स 865 अंकांनी उसळला आणि तो 58,848.36 वर पोहोचला. ही वाढ एकूण 1.44 टक्क्यांची आहे. तर निफ्टीही 212 अंकांनी वधारला आहे.
बजेट सुरु होताच निफ्टीमध्ये 212 अंकांची वाढ झाली असून तो 17,552.75 वर पोहोचला आहे. निफ्टीमध्ये ही वाढ एकूण 1.20 टक्क्यांची आहे.
बजेटच्या सुरुवातीने शेअर मार्केटमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
अर्थसंकल्पाकडून शेअर बाजाराच्या काय अपेक्षा आहेत?
शेअर बाजाराला सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) वर थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय गुंतवणूकदारांचे भांडवल वाढवण्यासाठी सरकारकडून काहीसा दिलासा मिळू शकतो. शेअर बाजारात आकारण्यात येणाऱ्या भांडवली नफा करातही सरकारकडून काही प्रमाणात सवलत अपेक्षित आहे.