Urban unemployment rate : देशात हळूहळू बेरोजगारीचा दर (Urban Unemployment rate) कमी होत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण, सांख्यिकी मंत्रालयाने (Ministry of Statistics) एक लेबर फोर्स सर्व्हे ( Labor Force survey) प्रसिद्ध केलाय. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर झपाट्यानं कमी होत असल्याचं म्हटलं आहे. 2023 पासून यामध्ये घसरण सुरुच आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत शहरी भागातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमधील बेरोजगारीचा दर 6.5 टक्क्यांवर घसरला. 2022 मध्ये हा आकडा 7.2 टक्के होता. हा बेरोजगारीचा दर पुरुषांबरोबरच महिलांमध्येही कमी झाला आहे.


शहरी भागात लोकांना मिळतेय जास्त काम 


मंत्रालयानं केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरी भागात लोकांना जास्त काम मिळत आहे. मंत्रालयाने एप्रिल 2017 मध्ये हे सर्वेक्षण सुरू केले होते. याद्वारे, श्रमशक्तीचा डेटा प्रत्येक तिमाहीत उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये 15 वर्षांवरील लोकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, पुरुषांचा बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर 2022 मधील 6.5 टक्क्यांवरून ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये 5.8 टक्क्यांवर आला. याच कालावधीत महिलांचा बेरोजगारीचा दर 9.6 टक्क्यांवरून 8.6  टक्क्यांवर घसरला. दरम्यान, कामगार ते लोकसंख्येचे प्रमाण (WPR) चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 46.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात हा आकडा 44.7 टक्के होता. पुरुषांसाठी डब्ल्यूपीआर 68.6 टक्क्यांवरुन 69.8 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. महिलांसाठी हाच आकडा 20.2 टक्क्यांवरुन 22.9 टक्के झाला आहे. 


ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 (October- December) तिमाहीत सर्वेक्षणासाठी 44,544 कुटुंबे आणि 1.69 लाख लोकांकडून डेटा गोळा करण्यात आला आहे. शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण कमी होत आहे. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी कामगार दल सर्वेक्षण डेटा नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार बेरोजगारीचा दर 6.6 टक्क्यांवर आला होता. दरम्यान, हा बेरोजगारीचा दर पुरुषांबरोबरच महिलांमध्येही कमी झाल्याची माहिती या अहवालामध्ये देण्यात आली आहे.


कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारीत झाली होती वाढ (Unemployment increased during the Corona crisis)


कोरोना संकटाच्या काळात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळं एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत एकूण बेरोजगारीचा दर 20.9 टक्क्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. यामुळे देशभरातील रोजगाराच्या संधींबाबत चिंता निर्माण झाली होती. 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांसाठी, डिसेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर 5.8 टक्क्यांवर घसरला. जुलै-सप्टेंबर या कालावधीत ते 6 टक्के आणि ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीत 6.5 होता.


महत्वाच्या बातम्या: 


बेरोजगारी कमी करण्यासाठी 'या' राज्य सरकारचा नवा प्लॅन, या योजनेवर देणार 50 टक्के अनुदान