नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं सोमवारी टॅरिफ नियमांमध्ये दुरुस्ती केली. या दुरुस्तीनंतर मोबाईल सेवा कंपन्यांना इंटरनेट म्हणजेच डेटाचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएस साठी रिचार्ज प्लॅन आणवे लागतील. याशिवाय ट्रायनं विशेष रिचार्ज प्लॅनची मुदत 90 दिवसांवरुन 365 दिवस देखील केली आहे. 


ट्रायनं दूरसंचार ग्राहक संरक्षण अधिनियमात केलेल्या बाराव्या दुरुस्तीनुसार मोबाईल नेटवर्क सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना किमान एक विशेष टॅरिफ व्हाऊचर फोन कॉलिंग आणि एसएमएससाठी जारी करावा लागेल. ज्या रिचार्ज प्लॅनची वैधता 365 दिवस असेल. या निर्णायाचा फायदा अशा ग्राहकांना होईल जे यूजर्स इंटरनेटचा वापर करत नाहीत. केवळ फोन कॉलिंग आणि एसएमएसचा वापर करतात. 


मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना किमान 10 रुपयांपासून रिचार्ज पॅक जारी करावा लागेल. ट्रायनं मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना  कोणत्याही दराचे रिचार्ज व्हाऊचर जारी करण्यास परवानगी दिली आहे.


काही ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या घरी ब्रॉडबँड सेवा आहे अशा घरातील यूजर्सला त्यांच्या मोबाईलसाठी स्वतंत्र डेटा रिचार्जची गरज लागत नाही. याशिवाय टूजी नेटवर्कचा वापर करणाऱ्या यूजर्सला देखील बऱ्याचदा इंटरनेट लागत नाही, अशा ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.   
 
ट्रायच्या आदेशानुसार कंपन्यांना डाटा ओन्ली एसटीव्ही आणि बंडल ऑफर शिवाय कॉलिंग अन् एसएमएससाठी स्वतंत्र  एसटीव्ही अनिवार्य करण्यात येणार आहे. 


30 दिवसांमध्ये आदेश लागू होणार


ट्रायचा हा आदेश पुढील 30 दिवसांमध्ये लागू केला जाणार आहे.  कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनसह आणखी रिचार्ज प्लॅन आणावे लागतील. त्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन असतील. ज्यांना डेटा वापरायचा नाही अशा ग्राहकांना याचा फायदा होईल. फीचर फोन यूजर्स, 2 जी सीमचे यूजर्स यांना याचा फायदा होईल.  


भारतात जवळपास 2G चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या 15 कोटी आहे. या ग्राहकांना त्यांच्या फोनवर इंटरनेटचा वापर करायचा नसतो.  ट्रायच्या चौकशीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 15 कोटी यूजर्स फीचर फोनचा वापर करतात, या ग्राहकांना फोन कॉलिंग आणि एसएमएसच्या रिचार्ज प्लॅनची आवश्यकता असते.


ट्रायच्या या निर्णयाला मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून विरोध होता.एअरटेल त्यांच्या 2G यूजर्सना वेगानं  4G नेटवर्कमध्ये आणलं जात आहे. बीएसएएनलनं मात्र ट्रायच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.






इतर बातम्या :