Top Mid Cap Funds: मिडकॅप फंडांबद्दल (Midcap Funds) गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि आकर्षण कायम आहे. AMFI ने जारी केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात इक्विटी फंडांमध्ये एकूण 16997.09 कोटी रुपये आले आहेत. यापैकी 1393.05 कोटी रुपये मिडकॅप फंडात आले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीबद्दल बोलायचे झाल्यास, इक्विटी फंडांमध्ये एकूण 52490.69 कोटी रुपये आले आहेत. त्यापैकी मिडकॅप फंडांमध्ये 6467.70 कोटी रुपये आल्याची माहिती देण्यात आली आहे. 


वर्ष 2023 मध्ये, निफ्टी मिडकॅप फंड निर्देशांकात 45 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही मिडकॅप म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुम्ही किमान 3 ते 5 वर्षांचा गुंतवणुकीचा दृष्टीकोन ठेवावा. आपण 2023 मधील टॉप-3 मिडकॅप फंडांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांनी संपूर्ण वर्षभरात 50 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.


महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप फंड


महिंद्रा मॅन्युलाइफ मिडकॅप फंडाची 1 जानेवारी 2024 रोजीची NAV थेट योजनेसाठी 28.81 रुपये आहे. थेट योजनेसाठी एक वर्षाचा परतावा 50.17 टक्के आहे. निधीचा आकार 1920 कोटी रुपये आहे. हा निधी जानेवारी 2018 मध्ये सुरु करण्यात आला होता. त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे 160 टक्के परतावा दिला आहे.


निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड


1 जानेवारी 2024 रोजी निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाची एनएव्ही 3490 रुपये आहे. निधीचा आकार 23600 कोटी रुपये आहे. एका वर्षात थेट योजनेसाठी 50.09 टक्के परतावा दिला आहे. हा निधी ऑक्टोबर 1995 मध्ये सुरु करण्यात आला आहे. एकरकमी गुंतवणूकदारांना सुरुवातीपासून 31815 टक्के बंपर परतावा दिला गेला आहे.


जेएम मिडकॅप फंड


1 जानेवारी 2024 रोजी जेएम मिडकॅप फंडाची एनएव्ही 15 रुपये आहे. निधीचा आकार 695 कोटी रुपये आहे. थेट योजनेसाठी एक वर्षाचा परतावा 47.85 टक्के आहे. हा निधी नोव्हेंबर 2022 मध्ये सुरु करण्यात आला होता. याने सुरुवातीपासून 50 टक्के परतावा दिला आहे.


(कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )


महत्त्वाच्या बातम्या:


Multibagger Stocks : स्टॉक असावा तर असा! पाच वर्षात 17 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती