India GDP Growth: सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीचे GDP वाढी संदर्भातील आकडे जाहीर केले आहेत. निवडणुकीपूर्वी जीडीपीच्या दरात चांगली वाढ (Growth rate) झाल्याचे दिसून आले आहे. ही वाढ 8.4 टक्क्यांची आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवलेल्या 4.3 टक्क्यांच्या वाढीच्या दरापेक्षा हा दर खूप जास्त आहे. हा विकासदर केवळ अर्थव्यवस्थेसाठी आणि सरकारसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.


आरबीआयने डिसेंबरच्या तिमाहीत आर्थिक वाढीचा अंदाज 6.5 टक्के ठेवला होता. जर आपण एसबीआय अंदाजाबद्दल बोललो तर त्याचा अंदाज 6.5 ते 6.9 टक्के दरम्यान होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर 7.6 टक्के राहिला आहे. त्यानुसार, देशाच्या जीडीपीमध्ये तिमाही आधारावर लक्षणीय वाढ झाली आहे.


गासमोर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल : अमित शाह


दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांची खरी ताकद भारताच्या उत्कृष्ट जीडीपी वाढीमध्ये असल्याचे शाह यांनी म्हटलं आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत विक्रमी 8.4 टक्क्यांची वाढ जीडीपीत झाली आहे. आपण ज्या वेगानं गरिबी कमी करत आहोत, त्याचा पुरावा आहे. यामुळं जगासमोर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल असं अमित शाह यांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.


 मुख्य क्षेत्रातही सकारात्मक वाढ


वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की जानेवारीमध्ये भारतातील 8 प्रमुख क्षेत्रांचा विकास दर वार्षिक आधारावर 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. याशिवाय या महिन्याबद्दल बोलायचे झाले तर विकास दर 3.6 टक्के राहिला आहे. डिसेंबर 2023 मध्ये निर्देशांक 4.9 टक्के आणि जानेवारी 2024 मध्ये 9.7 टक्के दराने वाढेल.सरकारी आकडेवारीनुसार, मुख्य क्षेत्रातही सकारात्मक वाढ दिसून आली आहे. ही वाढ कोळसा, पोलाद, सिमेंट, नैसर्गिक वायू, वीज आणि कच्चे तेल उत्पादनात झाली आहे.


आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी डेटा जारी करताना, सांख्यिकी मंत्रालयाच्या NSO (नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस) ने सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत 8.4 टक्के वाढ दर्शविली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत GDP 40.35 लाख कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 43.72 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.


उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा अंदाज


सांख्यिकी मंत्रालयाच्या NSO ने दिलेल्या माहितीनुसार, उत्पादन क्षेत्राचा विकासदर 11.6 टक्के आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्राचा विकासदर 9.5 टक्के राहिला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी दुसरा आगाऊ अंदाज देखील जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये NSO ने म्हटले आहे की आर्थिक वर्षात GDP 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर 2022-23 मध्ये ते 7 टक्के होईल. सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी 172.90 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, जो 2022-23 मध्ये 160.71 लाख कोटी रुपये होता.


महत्वाच्या बातम्या:


तिसऱ्या तिमाहीचा GDP आज जाहीर होणार,  6.9 टक्के GDP राहण्याचा अंदाज