Auto News : सणासुदीच्या काळात कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑक्टोबरमध्ये अनेक नवीन कार बाजारात येणार आहेत. यातील बहुतेक कार एसयूव्ही मॉडेलच्या आहेत. आज आपण अशा टॉप कारबद्दल माहिती घेऊयात.
Mahindra XUV700
महिंद्रा XUV 500 कारनंतर आता कंपनी XUV 700 घेऊन आली आहे. ही कार 7 ऑक्टोबर रोजी बाजारात येत आहे. 2 ऑक्टोबरपासून या कारची टेस्ट ड्राइव्हही सुरू झाली आहे. XUV700 एक उत्तम इंजिन, सेगमेंट-फर्स्ट फीचर्स आणि पाच किंवा सात सीटर कॉन्फिगरेशनच्या ऑप्शनसह येते. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे पेट्रोल इंजिन 2 लिटर आणि डिझेल इंजिन 2.2 लिटर आहे. व्हेरिएंटनुसार, यात 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. महिंद्राची नवीन मध्यम आकाराची SUV ADAS, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 10.25-इंच डिस्प्ले, इन्फोटेनमेंट टचस्क्रीन आणि 360-डिग्री कॅमेरासह सुसज्ज असेल. या कारची किंमत 11.99 लाख ते 19.79 लाखांपर्यंत आहे. बाजारात ही कार MG Hector Plus, Tata Safari, Hyundai Alcazar आणि Kia Seltos यांच्याशी स्पर्धा करेल.
Toyota Fortuner Legender 4x4 AT
2021 च्या सुरुवातीला, टोयोटाने भारतातील फेसलिफ्टेड फॉर्च्युनरसह एक नवीन लेजेंडर व्हेरिएंट देखील सादर केले. जे स्पोर्टी डिझाइनमध्ये येते. या कारमध्ये 6 ऑटोमॅटिक स्पीड आहे. यात 2.8 लीटर डिझेल (204PS/500Nm) इंजिन आहे. या कारची किंमत 40 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. ही कार बाजारात एमजी ग्लोस्टरशी स्पर्धा करेल.
एमजी एस्टर (MG Astor)
एमजी मोटर आपली नवीन एसयूव्ही, एमजी एस्टर मध्यम आकाराची एसयूव्ही पर्सनल एआय असिस्टेंटने सुसज्ज असेल. हे त्याचे खूप मोठे वैशिष्ट्य आहे, जे माणसांप्रमाणे भावना आणि आवाजात काम करते. तसेच हा पर्सनल AI असिस्टंट आपल्याला विकिपीडियासह प्रत्येक विषयावर संपूर्ण माहिती देण्यास सक्षम आहे. एमजी एस्टरचा हा वैयक्तिक AI असिस्टंट खूप खास आहे. हे कारच्या डॅशबोर्डवर बसवण्यात आले आहे आणि त्यासोबत एक स्क्रीन देखील देण्यात आली आहे. हे तुमच्या व्हॉईस कमांडवर काम करते. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच, सनरूफ उघडणे आणि बंद करणे यासारख्या विविध कार्यांमध्ये मदत करण्यास सक्षम आहे. हे पर्सनल AI असिस्टंट अमेरिकेच्या स्टार डिझाईन कंपनीने तयार केले आहे.
ह्युंदाई आय 20 एन लाइन (Hyundai i20 N Line)
ह्युंदाई आय 20 एन लाइन या कारमध्ये बरेच लेटेस्ट फीचर्स आहेत. 10.25 इंचाच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसोबतच नवीन i20 N लाइनमध्ये एक नवीन व्हॉइस रिकग्निशन फीचर देखील आहे, त्यामुळे ड्रायव्हिंगचा अजून चांगला अनुभव मिळतो. याशिवाय डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सिंगल-पॅन सनरूफ, 7-स्पीकर बोस साउंड सिस्टिम, 6 एअरबॅग, टीपीएमएस, रिअर-व्ह्यू पार्किंग कॅमेरा, स्वयंचलित हेडलॅम्प, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल(ESC), व्हेइकल स्टेबिलिटी कंट्रो (VSC), हील असिस्ट कंट्रोल (HAC) असे अनेक फीचर्स आहेत. ही कार भारतात दोन व्हेरिअंटमध्ये- N6 iMT, N8 iMT आणि N8 DCT लाँच करण्यात आली आहे. ही कंपनीच्या N Line मॉडलची भारतातील पहिलीच कार आहे. कारमध्ये कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचं 3-सिलेंडरयुक्त टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 120hp पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनसोबत 6-स्पीड iMT आणि 7-स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन गियरबॉक्स आणि पॅडल शिफ्टरचा पर्याय देखील आहे.
किया सेल्टोस एक्स लाईन (Kia Seltos X Line)
किआ सेल्टोस एक्स लाइन या कारमध्ये चमकदार ब्लॅक ग्रिल मिळेल. त्याच्या हेडलाइटमध्ये फारसा बदल दिसणार नाही. त्याचा फ्रंट बम्पर देखील इम्प्रुव्ह करण्यात आला आहे. त्याची रचना आणि मांडणी मुख्यत्वे पूर्वीसारखीच आहे. या एसयूव्हीमध्ये एपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह यूव्हीओ कनेक्टेड कार सिस्टीमसह 10.25-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसारखे फीचर्स मिळतील. याशिवाय, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, सनरूफ, एअर प्युरिफिकेशन सिस्टर, बोस साउंड सिस्टीम देखील देण्यात आली आहे. किआ सेल्टोस एक्स लाइनमध्ये 1.4-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटर आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. 1.4-लीटर GDI टर्बो पेट्रोल इंजिन 138bhp पर्यंत पॉवर आणि 250Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. याशिवाय 1.5 लीटर सीआरडीआय डिझेल इंजिन 113bhp पर्यंतची पॉवर आणि 250Nm पर्यंत टॉर्क जनरेट करेल.